• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील मंडळ अधिकाऱ्याने घेतली पन्हाळ्यात लाच, पंटरसह तिघांना घेतले ताब्यात..

Admin by Admin
February 13, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीतील मंडळ अधिकाऱ्याने घेतली पन्हाळ्यात लाच, पंटरसह तिघांना घेतले ताब्यात..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोतवाल – तलाठी – मंडळ अधिकारी -नायब तहसीलदार -तहसीलदार -प्रांतधिकारी -उप जिल्हाधिकारी – जिल्हाधिकारी….. अशा महसूल विभागातील प्रत्येक जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तींना अलीकडंच्या काळात लाच घेण्याची सवय लागल्याचे दिसून येत आहे. पैसे घेतल्याशिवाय कोणाचेच काम करायचे नाही जणू असा चंगच बांधलाय..!

पन्हाळा प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या – बक्षीसपत्राची नोंद घालण्याकरिता कोडोली येथील मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे (49, रा. शिराळा नाका, कचरे गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा) याला योगेश यशवंत गावडे (29, रा. शिनगारे गल्ली, कोडोली, ता.पन्हाळा) व सुशांत सुभाष चौगुले (30, रा. शहापूर, ता. पन्हाळा) या दोन पंटरमार्फत दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी कोडोली मंडल कार्यालयातच रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी मंडल अधिकारी माळगेसह पंटर योगेश गावडे व सुशांत चौगुले यांच्या विरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. कोडोली येथील एका शेतकर्‍याची शेतजमीन नावावर करणेकरिता पन्हाळा महसूल विभागाकडे एक महिन्यापूर्वी ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी कोडोली येथील मंडल अधिकारी कार्यालयात आला होता.

मंडल अधिकारी याचा पंटर योगेश गावडे याने तक्रारदारला मंगळवारी (दि 11) कार्यालयात बोलवून घेतले होते. तक्रारदार बराचवेळ कार्यालयात थांबूनही माळगे भेटू न शकल्याने तक्रारदार निघून गेले. पुन्हा पंटर गावडे याने तक्रारदाराच्या दुकानात जाऊन भेटून शेतजमीन सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी मंडल अधिकार्‍यास दोन हजार पाचशे रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यावेळी तक्रारदार व मंडल अधिकारी यांच्यामध्ये तडजोड होऊन 2 हजार रुपये देण्याचे ठरले. याची तक्रार संबंधित तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

त्यावरून बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान पथकाने सापळा रचून मंडल अधिकारी कार्यालयातच तक्रारदार पंटरकडे दोन हजार रुपये देताना पथकातील पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, गजानन कुराडे यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मंडल अधिकारी अरुण माळगे, पंटर योगेश गावडे व सुशांत चौगुले यांच्या विरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंडल अधिकार्‍यास तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन वसंतराव सपकाळ

Next Post

कोल्हापुरात दोन ठिकाणी गर्भलिंग निदान

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापुरात दोन ठिकाणी गर्भलिंग निदान

कोल्हापुरात दोन ठिकाणी गर्भलिंग निदान

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group