• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बस स्थानकावरून दागिने चोरणाऱ्या महिला गजाआड; सांगलीत साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin by Admin
February 12, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली | येथील मध्यवर्ती बस स्थानकावर महिलेचे ४ लाख ६० हजार रुपयाचे दागिने चोरणाऱ्या दोघा महिलांना एलसीबीच्या पथकाने गजाआड केले. वर्षा इक्बाल लोंढे (वय ३५) व सपना राजू चौगुले (२७, हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

इचलकरंजी येथील स्वाती सूर्यकांत नाडगौडा या ७ रोजी सांगलीत कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास त्या इचलकरंजीला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना त्यांची पर्स लांबवण्यात आली होती. ८ रोजी त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

‘स्थानिक गुन्हे अन्वेषण’चे सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक प्रलंबित गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना अंकली (ता. मिरज) येथे खेळण्याच्या दुकानासमोर दोन महिला चोरीचा माल विकण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन वर्षा लोंढे व सपना चौगुले या दोघींना ताब्यात घेतले.

महिला पोलिसांच्या मदतीने त्यांची झडती घेतली. तेव्हा वर्षा लोंढे हिच्या पर्समध्ये सोन्याचे दागिने व प्रवासी महिला स्वाती नाडगौडा यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम मिळून आले. चौकशी केल्यानंतर दोघांनी पाच दिवसापूर्वी सांगलीत बस स्थानकावर नाडगौडा या महिलेची पर्स चोरल्याची कबुली दिली. दोघी संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली, कोल्हापूरमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दोघींना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | कोर्टाच्या दारात रिक्षावाल्यांची हाणामारी..? बघून घेतोची भाषा करीत निघून गेले..!

Next Post

सांगलीत शाळकरी मुले नशेच्या आहारी; सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

सांगलीत शाळकरी मुले नशेच्या आहारी; सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group