• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत महायुतीचे मित्रपक्ष ‘या’पासून वंचित..? शासकीय समित्यांवर ५० टक्के नियुक्त्या; चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

Admin by Admin
February 12, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगलीत महायुतीचे मित्रपक्ष ‘या’पासून वंचित..? शासकीय समित्यांवर ५० टक्के नियुक्त्या; चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधी सर्वच पक्ष आपली तयारी करताना दिसत असून आपल्या स्थानिक नेत्यांना बळ देण्याचे काम करत आहेत.

अशातच सांगली जिल्ह्यात भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा, तालुकास्तरावरील विविध सत्तावीस शासकीय कमिट्यांवर कार्यकर्त्यांना लवकरच संधी दिली जाईल, असे सुतोवाच केले आहेत. तसेच लवकरच ‘महायुती’चा फॉर्म्युला ठरेल, असे सांगताना भाजप कार्यकर्त्यांची यादी तयार ठेवा, असे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ असून 50 टक्के नियुक्तीच्या जागा भाजपच्या वाट्याला येतील अशी चर्चा रंगली आहे.

चंद्रकांत पाटील सोमवारी (ता.10) जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, जिल्हा, तालुकास्तरीय विविध कमिट्या, जिल्हा नियोजन समिती, विशेष कार्यकारी अधिकारी आदी पदांवर कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. पण समाजातील सर्व घटकांतील कार्यकर्त्यांना ती देण्यात येईल. तर पक्षाशी एकनिष्ठ, पार्श्वभूमी आणि शिक्षण पाहिले जाणार आहे.

महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसह घटकपक्ष आहेत. त्यामुळे सर्वांना संधी द्यावी लागणार आहे. याबाबत महालीचा अद्याप फॉर्म्युला ठरलेला नसून तो ही लवकरच ठरेल. यानंतरच भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे यादी तयार करा, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

  • महायुतीचा ‘५०-२५-२५’ चा फॉर्म्युला

दरम्यान महायुतीत स्थानिक समित्यांसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जातेय. भाजप 50, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) 25-25 टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे. याची सुरूवात जिल्हा नियोजन समितीच्या 12 जागांपासून होणार असून सध्या पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. सांगलीत जिल्ह्यात महायुतीत भाजप मोठा भाऊ असून भाजपला 50 टक्के जागा मिळतील. यामुळे जिल्हा नियोजन समितीत भाजपला सहा आणि राष्ट्रवादी गटाला तीन, तर शिंदे सेनेला तीन जागा मिळणार आहेत.

  • घटक पक्षांच्या नियुक्त्या मिळणार?

सध्या या नियुक्त्या जागांच्या निश्चितीमुळे रखडल्या होत्या. पण आता जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चा सुरू झाल्याने महायुतीतील घटक पक्षांमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला आणि आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला वाटा मिळणार का असा सवाल आता दोन्ही संघटनांकडून केला जातोय. तर जिल्हा नियोजन समितीवर दावा केला जाण्याची शक्यता आहे.

Previous Post

सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे

Next Post

मुश्रीफ-आबिटकर यांच्यातील दुरावा कायम; ‘वैद्यकीय शिक्षण’च्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्य सुरू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मुश्रीफ-आबिटकर यांच्यातील दुरावा कायम; ‘वैद्यकीय शिक्षण’च्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्य सुरू

मुश्रीफ-आबिटकर यांच्यातील दुरावा कायम; 'वैद्यकीय शिक्षण'च्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्य सुरू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group