• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे

Admin by Admin
February 12, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | पुणे येथे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असणारे अशोक काकडे यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची नवी मुंबई येथील सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे.

डॉ. दयानिधी यांनी अडीच वर्षे सांगली जिल्ह्यात काम केले. अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी मंगळवारी दुपारी बदलीचे आदेश काढले.

अशोक काकडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील किकवी (ता. भोर) येथील असून, ते 2010 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून निवड झाल्यानंतर त्यांनी यापूर्वी सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण आयुक्त, पुणे येथे म्हाडाचे संचालक आणि पुणे येथे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. काकडे यांनी सांगलीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून 2003 ते 2005 मध्ये काम केले आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी काम केल्याने आपणाला जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. लवकरच आपण पदभार स्वीकारू, असे त्यांनी सांगितले.

डॉ. दयानिधी यांनी 29 जुलै 2022 रोजी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदावरून त्यांची सांगलीला बदली झाली होती. आता त्यांची बदली नवी मुंबई येथील सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे.

Previous Post

बलात्कार आणि संमतीने झालेले लैंगिक संबंध यात फरक करण्याची गरज

Next Post

सांगलीत महायुतीचे मित्रपक्ष ‘या’पासून वंचित..? शासकीय समित्यांवर ५० टक्के नियुक्त्या; चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत महायुतीचे मित्रपक्ष ‘या’पासून वंचित..? शासकीय समित्यांवर ५० टक्के नियुक्त्या; चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

सांगलीत महायुतीचे मित्रपक्ष 'या'पासून वंचित..? शासकीय समित्यांवर ५० टक्के नियुक्त्या; चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group