• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुश्रीफ-आबिटकर यांच्यातील दुरावा कायम; ‘वैद्यकीय शिक्षण’च्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्य सुरू

Admin by Admin
February 12, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मुश्रीफ-आबिटकर यांच्यातील दुरावा कायम; ‘वैद्यकीय शिक्षण’च्या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्य सुरू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

चौदा महिने जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले मुश्रीफ हे पुन्हा या पदासाठी इच्छुक होते. राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होण्यापूर्वी जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे बोलून दाखवले होते.

मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि त्यानंतर झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेले रुसवे-फुगवे आजही कायम आहेत. जिल्ह्यात यावरूनच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) व सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्यातील दुरावा कायम असून, आरोग्याशी संबंधित वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाकडे पालकमंत्री आबिटकर यांनी पाठ फिरवल्याने महायुतीत अजूनही सर्व काही आलबेल नसल्याचे पुढे आले आहे.

राज्यात प्रचंड बहुमत मिळूनही निकालाच्या पहिल्या दिवसापासून महायुतीत या ना त्या कारणाने नाराजीनाट्य सुरू आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री पद मिळणार नाही म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीच लांबला. त्यानंतर चांगल्या खात्यावरून मंत्रिमंडळ विस्तारही निकालानंतर तब्बल दीड महिन्यांनी झाला. मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक दिग्गजांना डावलण्यात आले.

त्यातून सुरू असलेले रुसवे-फुगवे आजही कायम असून, कोल्हापूरही त्याला अपवाद राहिलेले नाही. जिल्ह्यात दहाही जागा जिंकून महायुती मजबूत स्थिती आली आहे; पण मंत्रिमंडळात नाकारल्याने पहिल्या दिवसांपासून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर नाराज आहेत. त्यांनी उघडपणे ही नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे, तर आतापर्यंत त्यांनी त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री असलेल्या प्रकाश आबिटकर यांचे अभिनंदन करण्याचेही टाळले आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीतील अल्प उपस्थिती पाहता ते पालकमंत्र्यांकडे जातही नाहीत.

चौदा महिने जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले मुश्रीफ हे पुन्हा या पदासाठी इच्छुक होते. राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होण्यापूर्वी जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे बोलून दाखवले होते; पण त्यांना कोल्हापूरऐवजी वाशिमचे पालकमंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे तेही नाराज आहेत. सोमवारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्‍णालयातील विविध कक्षांचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पालकमंत्री आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची नावे होती. आबिटकर हेही सोमवारी दिवसभर जिल्ह्यातच होते. सायंकाळी ते कोल्हापुरात आले; पण मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला जाणे त्यांनी टाळले. यावरून या जिल्ह्यातील दोन मंत्र्यांतच पालकमंत्री पदावरून दुरावा निर्माण झाला की काय, अशी चर्चा सुरू आहे.

  • महायुतीचे आमदार गैरहजर

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सोमवारी झालेल्या कार्यक्रमाची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे. त्यात महायुतीसह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींची नावे उपस्थितांत आहेत; पण महायुतीचा एकही आमदार या कार्यक्रमाकडे फिरकला नाही. विशेष म्हणजे शहरातील काही आमदार कोल्हापुरात होते. पक्षाच्या राज्यसभा व लोकसभा खासदारांनाही तिकडे जाण्याचे टाळले. याचीही चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू आहे.

Previous Post

सांगलीत महायुतीचे मित्रपक्ष ‘या’पासून वंचित..? शासकीय समित्यांवर ५० टक्के नियुक्त्या; चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

Next Post

‘या’ महिला अध्यक्षाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; दोघांना अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘या’ महिला अध्यक्षाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; दोघांना अटक

'या' महिला अध्यक्षाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; दोघांना अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group