• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिराळ्यात राजकीय भूकंप.! नेते महायुतीसोबत जाणार.?

Admin by Admin
February 11, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिराळा विधानसभा मतदारसंघात आता पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघात विरोधक राहणार नसल्याची स्थिती निर्माण होणार आहे. सत्ताधारी महायुतीसोबत शिराळा मतदारसंघातील दोन माजी आमदार जाणार असल्याचे बोलले जात आहे.

राजीनामा अन् विधान परिषद..

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षपदाचा विराज नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. हा राजीनामा म्हणजे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गळ्यात विधान परिषदेची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे विराज यांनी राजीनामा दिला असावा, अशी राजकीय गोटात चर्चा आहे.

त्यामध्ये माजी आमदार मानसिंगराव नाईक हे अजित पवार गटात व शिवाजीराव नाईक हे शिंदेसेनेत प्रवेशाची मतदारसंघातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

१९७८ पासून शिराळा मतदारसंघात कायम काहींना काही राजकीय घडामोडी होत आहेत. शिराळ्यात शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक व फत्तेसिंगराव नाईक हे गट कार्यरत होते. यामध्ये नानासाहेब महाडिक यांचा गटही कार्यरत झाला. १९९५ मध्ये मोठी घडामोड होऊन दोन नाईक गट एकत्र आले. यावेळी राजकीय समीकरण बदलून काँग्रेसची सत्ता गेली. यानंतर पुन्हा नाईक, देशमुख, नाईक व महाडिक या राजकीय गटांची युती वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेली.

बदलत्या समीकरणाने शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक यांना आमदारकीची संधी मिळाली. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे सत्यजीत देशमुख निवडून आले. राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेसेना यांची सत्ता आहे. या बदलत्या राजकीय समीकरणाचा फटका मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांना बसला. त्यामुळे दोन्ही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदेसेनेसोबत जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.

Previous Post

मोठी बातमी | ‘या’ जोडप्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! पोलिसांच्या सुरक्षेत मिळणार ‘सेफ हाऊस’..!

Next Post

वक्फ बोर्डास विवाह, घटस्फोट प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वक्फ बोर्डास विवाह, घटस्फोट प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही!

वक्फ बोर्डास विवाह, घटस्फोट प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group