• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग! सोलापुरात मनाई आदेश लागू

Admin by Admin
February 11, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग! सोलापुरात मनाई आदेश लागू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर शहरात (पोलीस आयुक्तालय हद्दी मध्ये) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि 13 फेब्रुवारी 00.01 वाजले पासुन ते 27 फेब्रुवारी 2025 रात्री 24.00 वाजे पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. पोलीस उपायुक्त, (शहर) डॉ.दिपाली काळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

सोलापूर शहर धार्मिक सण, उत्सव ,जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. शहरात छोट्या मोठ्या कारणावरुन संप आंदोलने, निदर्शने होत असतात. आगामी काळात शब-ए-बरात, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महरशिवरात्री सण, उत्सव संपन्न होणार आहेत.तसेच इयत्ता 12 वी आणि 10 वी शालांत व माध्यमिक बोर्ड परीक्षा यासह मराठा, ओबीसी व धनगर आरक्षण वर्गैरेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, तसेच 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश सक्षम पोलीस प्राधिकरणाची पुर्वपरवानगी घेतलेल्या मिरवणूका ,मोर्चे, रॅली,आंदोलने निवेदने , धरणे सभा यांना वगळून तसेच अंत्ययात्रा व अत्यावश्यक सेवा यांना लागू होणार नाहीत.

Previous Post

झेड.पी. इच्छुकांच्या मेहनतीवर पाणी फिरणार? मतदारसंघ पुनर्रचना होणार…

Next Post

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोघे निलंबित ,मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोघे निलंबित ,मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोघे निलंबित ,मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group