• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत कुत्रे आडवे आल्याने अपघात, पोलीस हवालदार ठार, एक जखमी

Admin by Admin
February 11, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत कुत्रे आडवे आल्याने अपघात, पोलीस हवालदार ठार, एक जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी : मिरजेत सांगली रस्त्यावर मोकाट कुत्रे आडवे आल्याने अपघातात पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम (वय ४०, रा सुभाषनगर मिरज) हे ठार झाले. तर, दुचाकी चालक प्रकाश तातोबा संपकाळ हे जखमी झाले.

पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सम्राट कदम हे त्यांच्या मेव्हणा प्रकाश संकपाळ यांच्या (एम एच १० बी.एफ ४५७७) दुचाकीवरून सोमवारी रात्री नऊ वाजता सांगलीकडे जात होते. यावेळी मिरजेतील सिद्धी विनायक हॉस्पिटल समोर अचानक मोकाट कुत्रे आडवे आल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलीकडे पडले. यावेळी समोरून वेगात आलेल्या मोटारीने त्यांच्या डोक्याला ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. जखमी दुचाकी चालक प्रकाश संपकाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून मोकाट कुत्र्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. सोमवारी झालेल्या अपघातात पोलीस हवालदार सम्राट कदम यांचा नाहक बळी गेला. सम्राट कदम यांनी वीस वर्षे पोलिस दलात सेवा केली होती. कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पोलीसांनी दुचाकीचालक प्रकाश संपकाळ रा. कवठेपीरान ता मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गांधी चौक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कोणाचीही गय करू नका, कायद्याचा धाक तयार करा

Next Post

झेड.पी. इच्छुकांच्या मेहनतीवर पाणी फिरणार? मतदारसंघ पुनर्रचना होणार…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
झेड.पी. इच्छुकांच्या मेहनतीवर पाणी फिरणार? मतदारसंघ पुनर्रचना होणार…

झेड.पी. इच्छुकांच्या मेहनतीवर पाणी फिरणार? मतदारसंघ पुनर्रचना होणार...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group