Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कोणाचीही गय करू नका, कायद्याचा धाक तयार करा

Admin by Admin
February 11, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कोणाचीही गय करू नका, कायद्याचा धाक तयार करा

सांगली प्रतिनिधी | कायद्याचा धाक तयार करा. अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. अमली पदार्थ लागवड, वाहतूक, विक्री, तस्करी करणार्‍या कुणाचीही कसलीही गय करू नका, असे सक्त आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

सांगली सोमवारी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीत पालकमंत्र्यांनी कडक सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील 134 बंद कारखान्यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र आदेश देण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना केली. तसेच तपासणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश टास्क फोर्सला दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पोलिस स्थानकनिहाय तपासणी पथक तयार करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील बंद कारखाने तपासावेत, अशी सूचना दिली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी 2025 मधील अमली पदार्थविरोधी कारवाईची तसेच, गतवर्षी केलेल्या कारवाईची माहिती सादर केली.

यावेळी ‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते.

Previous Post

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा; पुन्हा मंगेश चिवटेंकडे सोपवली धुरा

Next Post

मिरजेत कुत्रे आडवे आल्याने अपघात, पोलीस हवालदार ठार, एक जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत कुत्रे आडवे आल्याने अपघात, पोलीस हवालदार ठार, एक जखमी

मिरजेत कुत्रे आडवे आल्याने अपघात, पोलीस हवालदार ठार, एक जखमी

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014