• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | अपघातात धर्मगुरूचा मृत्यू

Admin by Admin
February 7, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | अपघातात धर्मगुरूचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली – इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मीफाट्याजवळ चारचाकी गाडीचे टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातात इस्लामपूर येथील धर्मगुरूंचा जागीच मृत्यू झाला. हाफीज अलीम मन्सूर बारस्कर (वय 50, रा.इस्लामपूर) असे मृत धर्मगुरूंचे नाव आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडला.

हाजी अस्लम मिस्त्री (वय 62), समीर सरवर मुल्ला (50), फैयाज लियाकत इबुशी (52, सर्व रा. इस्लामपूर) अशी जखमींची नावे आहेत. यातील समीर मुल्ला यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी आहेत.

याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अलीम बारस्कर व जखमी तिघे इस्लामपूर येथील आहेत. बारस्कर धर्मगुरू होते. गुरुवारी दुपारी चौघेजण सांगलीतील एका कुटुंबात भेटीसाठी इस्लामपूरहून चारचाकीने (एमएच 14, बीसी 6624) येत होते. लक्ष्मीफाट्याजवळ ते आले असता त्यांच्या मोटारीचे पुढील टायर फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी भरधाव वेगाने रस्त्याकडील विद्युत खांबावर जोरदार आदळली. त्यानंतर नव्या सिमेंटच्या रस्त्यावरून खड्ड्यात पलटी झाली. त्यात गाडीत पुढील सीटवर बसलेले हाफीज बारस्कर यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर समीर मुल्ला गंभीर जखमी झाले. यावेळी अस्लम मेस्त्री गाडी चालवित होते. त्यांच्याही पायाला दुखापत झाली आहे.

अपघातानंतर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फैयाज आणि अस्लम यांची प्रकृती स्थिर असून समीर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातात बारस्कर यांचा मृत्यू झाल्याचे समजताच समाजबांधवांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

  • विद्युत खांब वाकला

टायर फुटून मोटारीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याकडेला असलेल्या विद्युत खांबावर जोरदार आदळली. यात विद्युत खांब वाकला. त्यानंतर मोटार खड्ड्यात पलटी झाली. अपघातातील बारस्कर यांचा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. ते धर्मगुरू असल्याने समाजातही त्यांना मोठा मान होता. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Previous Post

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या दिशा समितीवर खा. विशाल पाटील

Next Post

‘या’ प्रकरणात खासगी सावकारी कनेक्शन?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘या’ प्रकरणात खासगी सावकारी कनेक्शन?

'या' प्रकरणात खासगी सावकारी कनेक्शन?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group