• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘या’ प्रकरणात खासगी सावकारी कनेक्शन?

Admin by Admin
February 7, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
‘या’ प्रकरणात खासगी सावकारी कनेक्शन?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

व्याजावर व्याज चक्रवाढ व्याजाने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त व्याजाची रक्कम गेली आणि जवळजवळ संपूर्ण कारखानाच संबंधित खासगी सावकारांच्या ताब्यात गेला, अशी चर्चा लोकांत सुरू आहे.

विट्यातील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती मिळत आहे. आता तर यात थेट सावकारी कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे.विट्यातला मेफेड्रॉन (एमडी) या ड्रग्जच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.

या घटनेला आता आठवडा उलटून गेला. एका महिलेसह एकूण सात जण याप्रकरणी अटकेत आहेत. त्यांना दहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही या ड्रग फॅक्टरीचा मालक नेमका कोण? यामागे कुणी स्थानिक बिल्डर, उद्योगपती अगर कोण कोण राजकीय शक्ती आहेत? याबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

आता नव्याने जी माहिती मिळाली आहे, त्यात ज्या विट्याजवळील कार्वे औद्योगिक वसाहतीत प्लॉट नंबर 43 वरच्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज हा एमडी ड्रग तयार करायचा कारखाना होता, त्या कारखान्याची एक मालक असलेली गोकुळा विठ्ठल पाटील ही विट्यातील महिला जिल्हा स्थानिक अन्वेषण विभागाच्या अटकेत आहे. मात्र तो कारखाना मुळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वेगळ्याच मालकाच्या नावाने नोंदणीकृत आहे. ज्या नावाने प्लॉट नंबर 43 वरच्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज हा खिळे, मोळे आणि पुठ्ठे बनवण्याचा हा कारखाना आहे, त्या मूळ मालकाने कारखाना सुरू करण्यासाठी विट्यातील काही जणांकडून काही लाख रक्कम व्याजाने घेतली होती. तो ती रक्कम व्याजासह ठरलेल्या वेळेत परत करू शकला नाही. त्यातून व्याजावर व्याज चक्रवाढ व्याजाने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त व्याजाची रक्कम गेली आणि जवळजवळ संपूर्ण कारखानाच संबंधित खासगी सावकारांच्या ताब्यात गेला, अशी चर्चा लोकांत सुरू आहे. त्यामुळे या ड्रग कारखाना तपासात खासगी सावकारीचेही कनेक्शन आहे, तेही तपासातून पुढे यावे अशी मागणी विटेकर करीत आहेत.

  • कारखाना उभारणीमध्ये पैसे कुणी लावले?

आतापर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी ड्रग्जचे साठे सापडत होते. त्यावर कारवाई होऊन संबंधित प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पुन्हा चार-आठ दिवसात शांत होत असे. कारण, ज्या लोकांवर कारवाई केली जायची, असे लोक जामिनावर बाहेर सुटलेले असायचे आणि त्यांचे खटले वर्षानुवषे चालायचे. परंतु विट्यामध्ये चक्क एमडी ड्रग्ज बनवायचा कारखाना सापडला. हा कारखाना नेमका कोणाचा, पैसे कोणी, कोणी लावलेत, हे शोधणे महत्त्वाचे आहे.

Previous Post

सांगली | अपघातात धर्मगुरूचा मृत्यू

Next Post

मोठी ब्रेकिंग | फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात शेत जमिनीच्या वापरासाठीची ‘NA’ अट रद्द

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | “देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुश्मनी नाही, ते आमचे.” महाविकास आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ..!

मोठी ब्रेकिंग | फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात शेत जमिनीच्या वापरासाठीची 'NA' अट रद्द

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group