• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | ट्रॅव्हल्स एजंटांकडून पोलिस अधिकाऱ्याला कॉलर पकडून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण; तिघांवर गुन्हा

Admin by Admin
January 30, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | ट्रॅव्हल्स एजंटांकडून पोलिस अधिकाऱ्याला कॉलर पकडून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण; तिघांवर गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर प्रतिनिधी | भरचौकातील हा प्रकार पाहून प्रवाशांसह एजंट, कामगार जमले. गर्दीचा फायदा घेत तीनही संशयितांनी मुळे यांच्या डोक्यात, कानावर, पायावर, पाठीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

मध्यवर्ती बसस्थानक (Kolhapur Bus Stand) परिसरातून निघालेल्या सहायक पोलिस निरीक्षकाला पुण्याचे तिकीट खपविण्याच्या फंदात हात पकडून पुण्याच्या बसकडे नेण्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला.

याला विरोध केल्याने संबंधित आरामबस तिकीट एजंटाने (Bus Agent) हुज्जत घालत पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. त्याच्या दोन साथीदारांनी केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विशाल दशरथ मुळे यांनी तिघांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात (Shahupuri Police Station) फिर्याद दिली. याप्रकरणी आकिब आरीफ पठाण (वय ३१, सरनोबतवाडी), दिलदार मन्सूर मुजावर (४१, रा. विक्रमनगर) व जावेद मुजावर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उच्च न्यायालयातील सुनावणीचे काम संपवून विशाल मुळे रात्री कोल्हापुरात परतले होते. मध्यरात्री बाराच्या सुमारास ते चालत पोलिस ठाण्याकडे येत होते. या वेळी आकिब मुजावर याने प्रवासी समजून त्यांना पुण्याच्या बसकडे ओढून नेण्याचा प्रयत्न केला. याला मुळे यांनी विरोध करत पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. दोघांतील वाद पाहून आकिबचा भाऊ दिलदार व जावेद आले. आकिबने मुळे यांची कॉलर पकडली, तर जावेदने डोळ्यांवर ठोसा मारल्यामुळे जखमी झाले.

गर्दी करून मारहाण….

भरचौकातील हा प्रकार पाहून प्रवाशांसह एजंट, कामगार जमले. गर्दीचा फायदा घेत तीनही संशयितांनी मुळे यांच्या डोक्यात, कानावर, पायावर, पाठीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. शाहूपुरी पोलिसांनी मुळे यांची सुटका करून घेत जमाव पांगवला. याप्रकरणी आकिब व दिलदार मुजावर यांना अटक केली. मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात नोंदविला.

संबंधित पोलिसाविरोधात तक्रार घ्यावी : कांबळे

मारहाण झालेला पोलिस अधिकारी साध्या वेशात असल्याने कोणाला ओळखले नाहीत. बसमधून केलेल्या प्रवासाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने त्यांनी कामगारांना मारहाण केली. संबंधित अधिकारीही मद्यधुंद अवस्थेत असल्याची तक्रार देण्यासाठी कर्मचारी दिलदार मुजावर आणि आकिफ पठाण शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले असता, त्यांना मारहाण केल्याचा आरोप जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी केला. याबाबत ऑनलाईन तक्रार केली असून, सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

Previous Post

ब्रेकिंग सांगली | खूनाच्या घटनेने कुपवाडात खळबळ : एमआयडीसी पोलिसांत आरोपी हजर..! वाचा सविस्तर

Next Post

सांगली ब्रेकिंग | ‘हा’ प्रकार पुन्हा दिसणारच नाही, कलेक्टरांनी बोलावली तातडीची बैठक..! हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई, प्रशासनाला आदेश.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | ‘हा’ प्रकार पुन्हा दिसणारच नाही, कलेक्टरांनी बोलावली तातडीची बैठक..! हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई, प्रशासनाला आदेश.

सांगली ब्रेकिंग | 'हा' प्रकार पुन्हा दिसणारच नाही, कलेक्टरांनी बोलावली तातडीची बैठक..! हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई, प्रशासनाला आदेश.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group