• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची ३१ लाखाची फसवणूक…

Admin by Admin
May 5, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची ३१ लाखाची फसवणूक…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील खुजगाव आणि सिद्धेवाडी येथील १० शेतकर्‍यांची (farmers) तब्बल ३१ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी ४ दलालांवर तासगाव पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महेश सुभाष पाटील खुजगाव येथील शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे.

रामा चौगुले, परमेश्‍वर चौगुले, अमित चव्हाण, अमोल पाटील कवठेमहांकाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दलालांनी फिर्यादी महेश याची गेल्या हंगामात द्राक्ष (grape) खरेदी केली होती. मात्र, द्राक्ष नेल्यापासून हे दलाल पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. गेल्या काही दिवसांपासून या दलालांनी संपर्कच तोडला होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश यांनी तासगाव पोलिसात (Police) फिर्याद दाखल केली आहे.

याच दलालांनी सन २०२० मध्ये सिद्धेवाडी येथील राजेंद्र पवार, अरविद दुबोले, पंडित पवार, शामराव चव्हाण, प्रकाश पवार, गुंडा चव्हाण, दिनकर चव्हाण व संतोष जाधव यांची द्राक्षे खरेदी केली होती. या शेतकर्‍यांंचेही पैसे दिलेले नाहीत. त्यांचीही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरवर्षी द्राक्ष दलालांकडून द्राक्ष उत्पादकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजार समित्या आणि द्राक्ष बागायतदार संघाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

जावयाने सासूला पट्टयाने मारले…

Next Post

इचलकरंजी नगरपालिकेत उडाली खळबळ, कोण म्हणाले मला जबाबदारीतून मुक्त करा; पहा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इचलकरंजी नगरपालिकेत उडाली खळबळ, कोण म्हणाले मला जबाबदारीतून मुक्त करा; पहा

इचलकरंजी नगरपालिकेत उडाली खळबळ, कोण म्हणाले मला जबाबदारीतून मुक्त करा; पहा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group