सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई परिसरात पूर्वीच्या राग मनात पकडून जावयाने सासुला पट्ट्याने मारहाण करून जखमी केले .
याप्रकरणी जखमी पुतळाबाई भानुदास गेजगे ,कोल्हापूर रोड ,सांगली यांनी मारहाण करणारा जावई अजय यशवंत हेगडे रा. निमशिरगाव याच्या विरोधात सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पुतळाबाई या संशयित हेगडे यांच्या सासू आहेत. त्यांचा पुर्वीपासुन वाद आहे, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास काम करत असलेल्या ठिकाणी आला व त्याने माझी बायको कुठे आहे, तिला माझ्याकडे पाठवून दे, नाहीतर तिला व तुमच्या कुटुंबाला मारून टाकीन, अशी धमकी दिली .त्यानंतर कमरेचा पट्टा काढून त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बाजूला पडलेली काठी घेऊन पुतळाबाई यांना मारहाण करण्यात आली.
वादावादी वाढताच लोक जमा होऊ लागले, त्यानंतर त्याने तेथून पळ काढला , पुतळाबाई यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

