• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, ३५ जण जखमी

Admin by Admin
January 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, ३५ जण जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी ता. वाळवा येथे पुलावरून एसटी बस ओढ्यात कोसळली. या अपघातात ३५ प्रवाशी जखमी झाले. जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय व इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज, सोमवार (दि.२७) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दहिवडी डेपोची दहिवडी-जोतिबा एसटी बस क्र (MH ३४ BT ४२०३)ही जोतिबाकडे निघाली होती. तांदुळवाडी ता. वाळवा येथे गुरव पुलाजवळ बस येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पंचवीस फूट खोल ओढ्यामध्ये कोसळली. अपघातात ३५ प्रवाशी तर चालक गंभीर जखमी आहे. सुदैवाने जिवीतहानी टळली.

मात्र, बसमध्ये एकूण किती प्रवाशी होते व चालक किंवा प्रवाशांची नावे समजू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील माने सह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा सुरु आहे.

..अन्यथा मोठा अडथळा झाला असता

बस कोसळलेल्या ओढ्यामध्ये वारणा नदी वरून आणलेल्या पाण्याच्या पाईप आहेत. सकाळी लाईट गेल्यामुळे या पाईप मधून पाणी बंद होते. अन्यथा अपघातामुळे पायपा फुटून येथे पाण्याचा मोठा साठा झाला असता यामुळे जखमींना बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असता.

Previous Post

मिरजेत मुलांच्या भांडणातून दोन गटात राडा; हवेत गोळीबार, एकास अटक, पिस्तूल जप्त

Next Post

ब्रेकिंग सांगली | खूनाच्या घटनेने कुपवाडात खळबळ : एमआयडीसी पोलिसांत आरोपी हजर..! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग सांगली | खूनाच्या घटनेने कुपवाडात खळबळ : एमआयडीसी पोलिसांत आरोपी हजर..! वाचा सविस्तर

ब्रेकिंग सांगली | खूनाच्या घटनेने कुपवाडात खळबळ : एमआयडीसी पोलिसांत आरोपी हजर..! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group