• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून ६ जणांनी मिळून एकाला भोसकून संपवलं, न्यायालयाकडून ५ जणांना मरेपर्यंत जन्मठेप

Admin by Admin
January 8, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी बातमी | तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून ६ जणांनी मिळून एकाला भोसकून संपवलं, न्यायालयाकडून ५ जणांना मरेपर्यंत जन्मठेप
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगलीतील कवठेमहांकाळ (Sangli Crime) तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे काही वर्षांपूर्वी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाचा भोसकून निर्घृण खून केला होता.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी पाच जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा ठोठाविण्यात आलेल्यांमध्ये संदीप दादासो चौगुले, विशाल बिरुदेव चौगुले, नानासो उर्फ सागर माणिक चौगुले, कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनप आणि विजय आप्पासो चौगुले यांचा समावेश आहे.

  • सहा जणांनी मिळून केला होता एकाचा भोसकून खून

अधिकची माहिती अशी की, धुळगाव येथे (Sangli Crime) काही वर्षांपूर्वी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून सहा जणांनी एकाचा भोसकून निर्घृण खून केला होता. सर्व आरोपी अग्रण धुळगाव येथे यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशा वेळी दंगा करीत होते. याप्रकरणी मयत अशोक भोसले, त्याचा भाऊ आणि वडील या तिघांनी पंच कमिटीकडे तक्रार केली होती. याचा राग मनात धरून सर्व आरोपींनी अशोक याचा कुकरी आणि गुप्तीने भोसकून निर्गुण खून केला होता. याप्रकरणी सर्वांना अटक करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षे यावर सुनावणी झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने खून प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये. तसेच गुन्ह्यात सहभागी असल्या प्रकरणी 143 कलमान्वये दोशी धरून सर्वांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .

  • न्यायालयाकडून एकाची निर्दोष मुक्तता

सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी कामकाज पाहिजे. त्यांनी केलेल्या युक्तीवादा नुसार हा निकाल न्यायालयाने सुनावलाय. तसेच जिल्ह्यातील हा प्रथमच निकाल असल्याचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्यात एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती व त्याचा सख्खा जुळा भाऊ या दोघांपैकी कुणाचा गुन्ह्यात नेमका कुणाचा सहभाग होता याची पडताळणी होऊ शकली नसल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे .

Previous Post

दोन कोटींची डिफेंडर गाडी अन् पोलिसाच्या घरी दीड कोटी; आ. धसांचे आकावर गंभीर आरोप

Next Post

धक्कादायक ब्रेकिंग | सांगलीतील बालिकेला साडेचार लाखाला विकले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक ब्रेकिंग | सांगलीतील बालिकेला साडेचार लाखाला विकले..!

धक्कादायक ब्रेकिंग | सांगलीतील बालिकेला साडेचार लाखाला विकले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group