• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दोन कोटींची डिफेंडर गाडी अन् पोलिसाच्या घरी दीड कोटी; आ. धसांचे आकावर गंभीर आरोप

Admin by Admin
January 8, 2025
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
दोन कोटींची डिफेंडर गाडी अन् पोलिसाच्या घरी दीड कोटी; आ. धसांचे आकावर गंभीर आरोप
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

भाजप आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज आमदार धस यांनी थेट देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ait Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत दोघांत काय चर्चा झाली याची माहिती धस यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

तसेच काही धक्कादायक खुलासे केले ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वाल्मिक कराडवर (Walmik Karad) धस यांनी वसुलीचे आरोप केले आहेत. ह्यांचे धंदे वेगवेगळे आहेत. या जितक्या टोळ्या आहेत त्यांच्यावर मोक्का लावला पाहिजे अशी मागणी धस (Suresh Dhas) यांनी केली आहे.

धस पुढे म्हणाले, वाल्मिक कराड अतिशय गंभीर प्रकरण आहे. कराडने मागील काही काळात मोठ्या टोळ्या तयार करण्याचं काम केलंय. या सगळ्या टोळ्यांवर मोक्का लावला नाही तर आज तिहार जेलमध्ये जे होतंय, मुंबईत सलमान खानपर्यंत जे येतंय तसा काहीसा प्रकार होऊ शकतो.

ज्या बँका बुडाल्या त्या बुडाल्यानंतर पोलीस तपास झाला त्यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी दीड कोटी रुपये सापडले. एक मल्टिस्टेट को ऑपरेटिव्हला दम देऊन दोन कोटींची डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी घेतली. अशा प्रकारच्या पैशांच्या देवाणघेवाणीमुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कुणाच्या बाजूने उभे राहिले तर या पैसे बुडवणाऱ्या लोकांच्या बाजूने असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.

ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे दीड कोटी रुपये सापडले त्याला वाचवायला वाल्मिक कराड होते. वाल्मिक कराड हा चोरांचा, दरोडेखोरांचा सगळ्यांचाच साथीदार आहे. आणि आता दोन दिवसांत जिथे कुठे मोर्चा असेल तिथे मी ह्या लोकांच्या प्रॉपर्टीचे आकडे जाहीर करणार आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता धस म्हणाले, मी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनीच तशी मागणी केली आहे. मी आका आणि आकांचे आका म्हणत होतो. पण मी आता अगदी स्पष्ट बोलत आहे. मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही असे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.

Previous Post

अवैध वाळूची वाहतूक करणा-या हायवा मालकांना जिल्हाधिका-यांचा दणका, ठोठावला चौदा कोटींचा दंड

Next Post

मोठी बातमी | तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून ६ जणांनी मिळून एकाला भोसकून संपवलं, न्यायालयाकडून ५ जणांना मरेपर्यंत जन्मठेप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून ६ जणांनी मिळून एकाला भोसकून संपवलं, न्यायालयाकडून ५ जणांना मरेपर्यंत जन्मठेप

मोठी बातमी | तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून ६ जणांनी मिळून एकाला भोसकून संपवलं, न्यायालयाकडून ५ जणांना मरेपर्यंत जन्मठेप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group