• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अवैध वाळूची वाहतूक करणा-या हायवा मालकांना जिल्हाधिका-यांचा दणका, ठोठावला चौदा कोटींचा दंड

Admin by Admin
January 8, 2025
in क्राईम
1 min read
0
अवैध वाळूची वाहतूक करणा-या हायवा मालकांना जिल्हाधिका-यांचा दणका, ठोठावला चौदा कोटींचा दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गेवराई – बीडच्या गेवराईतील गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा करणा-या वाळू माफियांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चाप बसविण्यास प्रारंभ केला असून, गेवराईच्या हायवा मालकांना नोटीसा पाठवत चौदा कोटींचा दंड आकारण्यात आला आहे.

एवढेच नाहीतर महसूलातील कर्तव्यात कसूर न दाखवणा-या कर्मचाऱ्यांना निलंबित करून दणका दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा करून मुजोर बनलेल्या वाळू माफियांना लगाम बसविण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बीड-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी जवळील टोलनाक्यावरील सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद फुटेजचा आधार घेत सोमवारी (ता. ६) गोकुळ गायकवाड या हायवा मालकास सात कोटी ३६ लाख दंडाची नोटीस देण्यात आली.

तर, बुधवारी देखील टोलनाक्यावरील फुटेजच्या पाहणीतून गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू वाहतूक करणा-या गेवराईतील समीर शेख (आहेर वाहेगाव) यांनी १०५ वेळा वाळू वहातूक केल्याने ३ कोटी १० लाख ४९ हजार, रिजवान शेख (हिरापुर) खेपा १९२ दंड ५ कोटी ३६ लाख २७ हजार, विश्वनाथ सुखदेव (म्हाळस पिंपळगाव) खेपा ३९, दंड १ कोटी ३९ लाख, गजानन मुगुटराव (बागपिंपळगाव) खेपा ९२ दंड २ कोटी ७६ लाख तसेच यांच्यासह बीड मधील एका हायवा मालकासह एकूण पाच हायवा मालकांना १४ कोटीहून आधिक दंड ठोठावण्यात आल्याची खात्रीलायक माहीती असून, जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या या कारवाईने वाळू माफीयांचे धाबे चांगलेच दणदणाले आहे.

गेवराईचे तहसिलदार चिडीचूपच –

बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गेवराईतील अवैध वाळू उपसा करणा-या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केला असताना गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांनी मात्र अजूनही चुपी घेतल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

पोलीस निरीक्षकासह, सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश..!

Next Post

दोन कोटींची डिफेंडर गाडी अन् पोलिसाच्या घरी दीड कोटी; आ. धसांचे आकावर गंभीर आरोप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दोन कोटींची डिफेंडर गाडी अन् पोलिसाच्या घरी दीड कोटी; आ. धसांचे आकावर गंभीर आरोप

दोन कोटींची डिफेंडर गाडी अन् पोलिसाच्या घरी दीड कोटी; आ. धसांचे आकावर गंभीर आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group