• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पोलीस निरीक्षकासह, सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश..!

Admin by Admin
January 8, 2025
in क्राईम
1 min read
0
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • मागणी केलेला हप्ता न दिल्याने वर्दीचा व अधिकाराचा गैरवापर करीत चुकीच्या पद्धतीने गोवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न.

अकोला,दि.०८ः- पोलीस निरीक्षक सायरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक करंदीकरवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले आहेत. शहरातील मूर्तिजापूर रोडवरील रामलता बिझनेस सेंटर जवळ असलेल्या हॉटेल महाकालीचे मालकाला खदान पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय सायरे ह्यांनी हॉटेल चालवू देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती.त्यांची ती मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी गेल्यावर्षी अंदाजे दहा महिन्यांपूर्वी हॉटेल महाकालीमध्ये बेकायदा प्रवेश करून हॉटेल मालकाच्या मुलाला जबरदस्तीने पोलिस स्टेशनला नेवून त्याचा मोबाईल हिसकावून घेत जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार घरगुती सिलेंडर जप्तीची कारवाई दाखवून त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते.

खदान पोलिसांच्या या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आवाहन देत एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.ह्या प्रकरणांत ह्यापूर्वी बऱ्याचदा झालेल्या सुनावणीत ठाणेदार धनंजय सायरे हे एका गंभीर प्रकरणांत आरोपी असल्याने जवळपास साडे पाच महिने फरार असल्याने स्वतः अथवा वकीलाच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्यास असमर्थ असल्याने सदरहू प्रकरणाची सुनावणी लांबली होती.

खदान पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल सुपूर्दनाम्यावर परत मिळण्यासाठी संबंधितांनी न्यायालयातून आदेश देखील आणला होता.परंतु तरीही ह्या अधिकाऱ्यांनी तो देण्यास टाळाटाळ केल्याने त्याबाबतही हायकोर्टाला अवगत करण्यात आले होते.तसेच पोलिसांनी अधिकार क्षेत्राबाहेर जावून वैयक्तिक फायद्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील याप्रकरणी शपथपत्र सादर करण्यास सांगितले होते.या दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तब्बल दहा महिन्यांनी अकोला जिल्हाधिकारी यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यां समोर हजर होवून खुलासा सादर करण्याबाबत दिनांक ३/१/२०२५ ला पोलीस मार्फत नोटीस दिली होती.हे विशेष.

नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने ह्या प्रकरणातील सरकारी पक्ष व फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेत अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार धनंजय महादेव सायरे व सहा.पोलिस निरीक्षक निलेश करंदीकर यांच्यावर फिर्यादीवर अत्यंत बेजबाबदारपणे गुन्हे दाखल केल्याबद्दल दिनांक ६/१/२०२५ ला अंतरिम आदेश पारित करीत जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांना ह्या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल हायकोर्टाला प्राप्त झाल्यावर ह्याप्रकरणांत पुढील कारवाईसाठी दिनांक २०/१/२०२५ ला सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.त्याच दिवशी ह्या प्रकरणाचा अंतिम आदेश पारित होण्याची शक्यता आहे.

Previous Post

कोल्हापुरात ‘मोक्का’तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच ‘नातेवाईक’ सुद्धा सामील

Next Post

अवैध वाळूची वाहतूक करणा-या हायवा मालकांना जिल्हाधिका-यांचा दणका, ठोठावला चौदा कोटींचा दंड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अवैध वाळूची वाहतूक करणा-या हायवा मालकांना जिल्हाधिका-यांचा दणका, ठोठावला चौदा कोटींचा दंड

अवैध वाळूची वाहतूक करणा-या हायवा मालकांना जिल्हाधिका-यांचा दणका, ठोठावला चौदा कोटींचा दंड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group