• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमध्ये आजपासून दिवस भव्य किर्तन महोत्सव सोहळा: शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन: माजी नगरसेवक गजानन मगदुम यांची माहिती

Admin by Admin
January 5, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमध्ये आजपासून दिवस भव्य किर्तन महोत्सव सोहळा: शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन: माजी नगरसेवक गजानन मगदुम यांची माहिती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध किर्तन महोत्सव म्हणुन परिचीत असणारा कुपवाडमधील भव्य किर्तन महोत्सव सोहळा पुन्हा रंगणार आहे. पाच ते सात जानेवारी या तीन दिवसीय कालावधीत किर्तन महोत्सव होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक गजानन मगदुम यांनी दिली.

माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने दरवर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी कुपवाडमधील अकुज ड्रीमलँडच्या मैदानावर ‘गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा ‘ कुपवाडकरांना पहायला मिळणार आहे. रविवार पाच ते सात जानेवारी या कालावधीत रात्री 8 ते 10 या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिध्द कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

यामध्ये दि.5 जानेवारी रोजी महिला कीर्तनकार हरीभक्त पारायण रोहिणीताई परांजपे व सोमवार दि.6 रोजी भागवताचार्य पुरुषोत्तम पाटील, तिसऱ्या दिवशी मंगळवार दि 7 जानेवारी रोजी मुस्लिम समाजातील राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते हरिभक्त पारायण कबीर अत्तार महाराज यांची कीर्तने ऐकायला मिळणार आहेत.यापुर्वी स्व.बाबामहाराज सातारकर, युवा महिला कीर्तनकार शिवलीला पाटील, बंडातात्या कराडकर, प्रकाश महाराज साठे,चैतन्य महाराज वाडेकर यांची प्रसिध्द किर्तने झाली आहेत. यंदाच्या कीर्तन महोत्सवाची तयारी नियोजन सुरू असुन कीर्तनाचे संयोजन श्री ग्रंथराज ज्ञानेशवरी पारायण सोहळा समितीकडे आहे. यासाठी महिला व पुरुष यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असुन गतवर्षीचा अनुभव पाहता यावेळी दहा हजार नागरिक या किर्तन सोहळ्याचा आनंद घेणेसाठी कुपवाड नगरीत येतील असा विश्वास शिवप्रेमी मंडळाच्या पदाधिकार्‍यांना आहे.

या किर्तन सोहळ्याचे नुकतेच जाहिरात कमान व व्यासपिठ उभारणी कामाचा शुभारंभ गावातील जेष्ठ नागरिक व श्री ग्रंथराज पारायण सोहळा समिती सदस्य यांच्या उपस्थितीत झाला.

किर्तन महोत्सव शिवप्रेमी मंडळाचे संस्थापक नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीस नगरसेवक गजानन मगदूम यांच्यासह ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील, , शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, दादासो पाटील, राजेंद्र पाटील, रामकृष्ण महाराज खाडे, बाळासाहेब पाटील, गंगाधर पाटील, राहुल कोल्हापुरे, कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विजय खोत, अरुण रुपनर,अजय माने , कल्लाप्पा कोरे,भाऊसाहेब पाटील, सी.आर.पाटील, बापुसो खांडेकर, सतीश पाटील, नितीन कारंडे, योगेश हिंगमिरे, कलाप्पा कोरे, कल्लापा हलींगळे, किशोर शितोळे ,भास्कर जमदाडे, महादेव कोरे , बापुसो तोडकर, कल्लापा सायमोते, हनमंत सरगर नितीन कांरडे शिवप्रेमी मंडळ व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कुपवाडकरांनी या कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक गजानन मगदुम यांनी केले आहे. व किर्तन समाप्तीच्या दिवशी मंगळवार दि.७ जानेवारीला किर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

Previous Post

वाल्मिक कराड गोत्यात, विष्णू चाटेची मोठी कबुली.. CID ची रिमांड कॉपी ‘गोपनीय खबऱ्या’च्या हाती

Next Post

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भिवंडी कनेक्शन उघड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भिवंडी कनेक्शन उघड

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भिवंडी कनेक्शन उघड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group