• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भिवंडी कनेक्शन उघड

Admin by Admin
January 5, 2025
in क्राईम, राजकीय
1 min read
0
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भिवंडी कनेक्शन उघड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बीडच्या मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपेडट समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणातील ४ प्रमुख आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना भिवंडी कनेक्शन समोर आले आहे.

या प्रकरणातील आरोपी ११ डिसेंबर रोजी भिवंडीतील वळगाव येथे आले होते अशी माहिती तपासातून उघड झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांचे मारेकरी भिवंडीच्या वळगाव येथील स्वरीत बिअर शॉप आणि हॉटेल दिपाली वाईन आणि डाईन बार अँड रेस्टॉरंट येथे आले होते. कारण या बिअर शॉपमध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या गावी राहणारा रवी बारगजे काम करत होता. त्यामुळे सुदर्शन घुले आणि त्याचे इतर साथीदार संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी जागा मिळावी म्हणून भिवंडीत आले होते.

या सर्व आरोपींनी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख डॉ. सोन्या पाटील यांचे कार्यालय गाठले. तिथून त्यांनी बिअर शॉपचे मालक विक्रम डोईफोडे यांचा पत्ता मिळवला आणि त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू ते ८ डिसेंबरलाच वैष्णोदेवी येथे फिरण्यास गेले होते. त्यानंतर ते स्वरीत बिअर शॉप आणि हॉटेल दिपाली बार अँड रेस्टॉरंट येथे पोहोचले.

हॉटेल दिपाली येथे हे सर्व आरोपी गेले होते खरं पण त्यांना तिथे घेतले नाही. हे सर्व आरोपी हॉटेल दिपाला पोहचल्यावतर तेथील कर्मचाऱ्यांनी ते आले असल्याची माहिती विक्रम डोईफोडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि त्यावेळी सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार थोड्या वेळात येतो असे सांगून निघाले तर पुन्हा परत आले नाही. या प्रकरणी बीड येथील तपास यंत्रणा या दोघांकडे चौकशीसाठी येऊन गेले आहेत.

Previous Post

कुपवाडमध्ये आजपासून दिवस भव्य किर्तन महोत्सव सोहळा: शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन: माजी नगरसेवक गजानन मगदुम यांची माहिती

Next Post

खाकीतील महाभागांकडून सावकारी जोमात.? कोट्यवधींची जागा हडपली लाखात..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!

खाकीतील महाभागांकडून सावकारी जोमात.? कोट्यवधींची जागा हडपली लाखात..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group