• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भिंतीलगत १५ दिवसांत दोन लाचखोर ताब्यात..! २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिसाला बेड्या.!

Admin by Admin
December 31, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भिंतीलगत १५ दिवसांत दोन लाचखोर ताब्यात..! २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिसाला बेड्या.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | बाल कामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणार्‍या विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील कर्मचार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

शेखर जयवंत पाटणकर (वय 42) असे पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार हे बांधकाम साईटवर सळई बांधण्याचे काम कंत्राट घेतात. दि. 7 डिसेंबररोजी तक्रारदाराने कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकामावर एक अल्पवयीन बालक नातेवाईकास भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा झालेल्या अपघातात अल्पवयीन बालक व त्याचे नातेवाईक जखमी झाले. पोलिस कर्मचारी पाटणकर याने गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी तक्रार केली. पाटणकर याने 25 हजाराची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाटणकर याने लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी केल्याचे समोर आले होते. विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, ऋषिकेश वडणीकर, सलीम मकानदार, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, सीमा माने, राधिका माने यांच्या पथकाने केली.

  • पंधरा दिवसात दोन लाचखोर ताब्यात…

फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीच्या कामात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात पन्नास हजाराची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील महिला हवालदार मनीषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय 42) यांना 17 डिसेंबररोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. आता शेखर पाटणकर याला 25 हजाराच्या लाचेप्रकरणी अटक झाली आहे. पंधरा दिवसांमध्ये दोन लाच प्रकरणांमुळे विश्रामबाग पोलिस ठाणे चर्चेत आले आहे.

Previous Post

इचलकरंजीतील शिवाजीनगर, शिरोळ पोलिस ठाणे ठरले राज्यात ‘सर्वोत्कृष्ट’; ‘या’ तीन पोलिस ठाण्यांचाही यादीत समावेश

Next Post

शिक्षण विभागात खळबळ | सेक्ससाठी पिसाळलेल्या महिला शिक्षिकेने शाळेतच दहावीच्या मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

शिक्षण विभागात खळबळ | सेक्ससाठी पिसाळलेल्या महिला शिक्षिकेने शाळेतच दहावीच्या मुलासोबत ठेवले शारीरिक संबंध.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group