शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आणि शिक्षक म्हणजे गुरु. विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. विद्यार्थी त्यांच्या घरापासून लांब म्हणजे शाळेत असतात, तेव्हा शिक्षकच त्यांचे पालक असतात.
शिक्षकांवर विद्यार्थ्यांची जबाबादारी असते. त्यांना योग्य मार्ग दाखवणं, देशासाठी एक चांगला नागरिक म्हणून तयार करणं ही शिक्षकांची जबाबदारी असते. पण काहीवेळा शिक्षकांना आपल्या या जबाबदारीचा विसर पडते. पुण्यातील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका शिक्षिकेनेच आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरोपी शिक्षिकेनेच तिच्या विद्यार्थ्याच लैंगिक शोषण केलं. या प्रकरणात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला असून संबंधित शिक्षिकेला अटक झाली आहे. लैंगिक प्रकरणात बालकांच संरक्षण करणाऱ्या 7,9, 11, 6, 12, 14 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार शाळेच्या स्टाफ रुममध्ये घडला. पुण्यात गंज पेठ भागात ही शाळा आहे. पीडित मुलगा दहाव्या इयत्तेत असून तो प्रिलियम परीक्षेसाठी शाळेत आला होता, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. हा सर्व प्रकार 27 डिसेंबर रोजी घडला.
उत्तेजित करुन स्टाफ रुममध्ये नेलं
आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याला उत्तेजित केलं व आपल्यासोबत स्टाफ रुममध्ये घेऊन गेली. शाळेच्या मुख्याध्यापकांना स्टाफ रुममध्ये सुरु असलेल्या प्रकाराची माहिती मिळताच ते तिथे गेले व रंगेहाथ शिक्षिकेला पकडलं. शाळा व्यवस्थापनाने मुलाच्या कुटुंबियांना या बद्दल कळवलं. त्यानंतर मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.