• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड येथे डंपरच्या धडकेत दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Admin by Admin
December 22, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाड येथे डंपरच्या धडकेत दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड-माधवनगर रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्‍या डंपरने मनोज ओंकार ऐवळे (वय 2, रा. शंकर सायकल दुकानासमोर, अहिल्यानगर, कुपवाड) या बालकाला जोरदार धडक दिली. डंपरचे पुढील डाव्या बाजूचे चाक अंगावरून गेल्याने बालक गंभीर जखमी झाले.

नातेवाईकांनी तातडीने त्यास रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना शनिवार, दि. 21 रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडल्या.

कुपवाड-माधवनगर रस्त्यालगत अहिल्यानगर येथे झोपडपट्टी आहे. मोलमजुरी करणारे ओंकार ऐवळे कुटुंबासह या झोपडपट्टीत राहतात. शनिवारी सकाळी त्यांचा दोन वर्षाचा मुलगा मनोज खेळत घरातून बाहेर रस्त्यावर आला. याचवेळी कुपवाडहून माधवनगरच्या दिशेने निघालेल्या भरधाव डंपरने (एमएच 10 डीटी 4447) त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकला मनोज रस्त्यावर पडला. डंपरचे पुढील डाव्या बाजूचे चाक अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज ऐकून ऐवळे कुटुंब रस्त्यावर धावले. डंपरखाली सापडलेल्या चिमुकल्या मनोजला पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. तातडीने त्याला उपचारासाठी सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

अपघातानंतर घटनास्थळी गर्दी होऊ लागल्याने चालकाने डंपर घटनास्थळी सोडून पळ काढला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. संतप्त जमावाने दगडफेक करीत डंपरच्या काचा फोडल्या. अपघाताची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याकडील सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून अपघातातील वाहन जप्त केले. मृत मनोज याचे आजोबा अशोक लालू ऐवळे यांनी अपघाताबाबतची तक्रार कुपवाड पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

कडेगावमधील जबरी चोरीचा छडा

Next Post

ढालेवाडीतील जवानाचा हृदयविकारामुळे मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ढालेवाडीतील जवानाचा हृदयविकारामुळे मृत्यू

ढालेवाडीतील जवानाचा हृदयविकारामुळे मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group