• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | देवदर्शनावरून परतताना डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार

Admin by Admin
December 2, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | देवदर्शनावरून परतताना डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इचलकरंजी खबऱ्या प्रतिनिधी / येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पूलानजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पती-पत्नी ठार झाले. देवदर्शनावरून परतत असताना डंपरने दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे (वय ५५) या जागीच ठार झाल्या, तर पती संजय सदाशिव वडिंगे (वय ५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रभारी अधिकारी होते. आणि एका महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. ते दररोज सकाळी पंचगंगा नदीकिनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परतत असताना हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली आणि आक्रोश केला. अपघातामुळे यशोदा पूलाजवळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत केली.

या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | मिरजेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला, तर संशयितांच्या घरावर दगडफेक – जोरदार राडा.!

Next Post

मिरजेत पोलीस ठाण्यासमोर तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत पोलीस ठाण्यासमोर तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न.

मिरजेत पोलीस ठाण्यासमोर तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group