• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मिरजेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला, तर संशयितांच्या घरावर दगडफेक – जोरदार राडा.!

Admin by Admin
December 1, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज शहरात विधानसभा निवडणुकी नंतर राजकीय वातावरण गेल्या दोन दिवसात शांत झालेय. गेल्या महिन्यात भाजप उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती. काल रात्री शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला करण्यात आला आहे.

 

मिरज शहारामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा युवा समन्वयकावर खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काझी याच्यासह हॉटेल मालक आणि त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, मिरजेत रवींद्र येसूमाळी यांचं रस्सा नावाचे हॉटेल आहे. हॉटेल मालक आणि एका कामगाराच आर्थिक देवाण-घेवाणीतून वाद सुरू होता. या वादातून अमन गोदड, सोहेल नदाफ, शंकर रिक्षावाला आणि शिव अथणीकर यांनी हॉटेलवर येत जोरदार राडा घातला. यावेळी हॉटेल मालक रवींद्र येसुमाळी आणि त्यांची पत्नी वैशाली येसूमाळी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी मतीन काझी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोरानी मतीन काझी याच्यावर देखील कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मतीन काझीसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

या हल्ल्यानंतर मतीन काझी टोळीने संशयीतांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून साहित्याची तोडफोड केली आहे. दरम्यान दोन गटात झालेल्‍या या हल्ल्यामुळे मिरजेत मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमला होता. परंतु पोलिसांनी लाठीमार करून जमावला पांगवले. जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर मात्र अद्याप पसार आहेत.

Previous Post

मिरज ब्रेकिंग | दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार, थेट मानेवर, गालावर अन हातावर ब्लेडने हल्ला..!

Next Post

ब्रेकिंग | देवदर्शनावरून परतताना डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | देवदर्शनावरून परतताना डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार

ब्रेकिंग | देवदर्शनावरून परतताना डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group