• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत पोलीस ठाण्यासमोर तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न.

Admin by Admin
December 7, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत पोलीस ठाण्यासमोर तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | येथील शहर पोलिस ठाण्यासमोर तरुणाने पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न आज केला. चोरीच्या गुन्ह्याचा तपास योग्यरितीने केला जात नाही असे तरुणाचा आरोप होता. नासिर शरीकमसलत (वय ३२, रा. मुजावर गल्ली, मिरज) असे तरुणाचे नाव असून, पोलिस कर्मचारी व नागरिकांनी त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला. शरीकमसलत हा सायंकाळी शहर पोलिस ठाण्यासमोर आला. त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचारी फारुख नालबंद, मारुफ चमनशेख यासह इतरांनी त्याच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेऊन त्यास रोखले.

काही दिवसांपूर्वी शरीकमसलत याच्या मालकीच्या सात शेळ्या चोरीस गेल्या आहेत. चोरीचा प्रकार घडल्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. शेळ्या चोरणाऱ्या संशयितास त्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तरीही पोलिसांनी त्यास सोडून दिल्याची नासिर शरीकमसलत याची तक्रार होती. याबाबत पाठपुरावा करूनही दाद दिली जात नसल्याचा त्याचा आरोप होता. नासिर याच्या तक्रारीचा योग्य तपास करून चोरट्यावर कारवाई करू, असे त्याला सांगण्यात आले.

Previous Post

ब्रेकिंग | देवदर्शनावरून परतताना डंपरची दुचाकीला धडक, पती-पत्नी ठार

Next Post

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व निकष शिथिल करणार; जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व निकष शिथिल करणार; जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व निकष शिथिल करणार; जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group