• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न नडला…

Admin by Admin
May 4, 2022
in क्राईम, राजकीय
1 min read
0
मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न नडला…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : दिवसेंदिवस मनसे (MNS) नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. कारण आता मनसे नेते संदीप देशपांडे ( Sandip Deshpande ) आणि संतोष धुरी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

या दोघांना पोलिसांना (Mumbai Police) चकमा देण्याचा प्रयत्न नडला आहे. या प्रकरणी पोलीस आता एक्शन मोडमध्ये आले आहे. त्यामुळे संदीप देशपांडेंचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. राज्यात सध्या यावरून जोरदार घमासान सुरू आहे. राज ठाकरे हे मशीदीवरील भोंगे उतरवण्यावर ठाम राहिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राज्यभर हनुमान चालीसा लावत रान पेटवलं आहे. पोलिसांनी इशारा दिल्यानंतरही गनिमी काव्याने हनुमान चालीसा लावण्याचे प्रयत्न मनसे कार्यकर्ते करत आहे. त्यामुळे पोलिसांकडून मनसे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. अनेकजण पोलिसांच्या ताब्यातही आहे. सकाळी पोलीस हे मनसे नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे.

नेमका प्रकार काय घडला

मुंबई पोलीस हे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांना चकवा देत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या गाडीत बसत पळ काढला. यावेळी पोलीस त्यांना थांबवण्याचा आणि पडण्याचा प्रयत्न करत होते. देशपांडे यांच्या काडीचा दरवाजाही उघडा होता. मात्र देशपांडे यांनी गाडी तशीच पुढे नेल्याने त्यांना पडण्याचा प्रयत्न करणारी महिला पोलीस कर्मचारी खाली कोसळली. संदीप देशपांडे हे निघून गेले. त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी त्यांच्यावर आणि धुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दोघांचा शोधही सध्या पोलीस घेत आहे. यात पोलीस आता कठोर पाऊलं उचलण्याची शक्यता आहे.

अनेक मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यभर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहे. तर काहींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर काही नुकसान केल्यास त्याची वसुलीही मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाईल असा इशाराही सरकारने दिला आहे. मात्र तरीही काही ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिही पोलिसांसाठीही कसोटीची राहणार आहे. तसेच सरकारही याबाबत लवकरच काही निर्णय घेण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्या मशीदीवरील भोंग्याचा वाद पेटला आहे. आता तर राज ठाकरेंनी याविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Previous Post

कुरुंदवाडमध्ये मुस्लीम मावळ्यांकडून शिवरायांची मशिदीत मुर्तीची प्रतिष्ठापना..

Next Post

१ मे चा झेंडा फडकवून मुख्याध्यापक झाला गायब ; दोन दिवस झेंडा फडकत होता, पोलिसांनी केला गुन्हा दाखल….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
१ मे चा झेंडा फडकवून मुख्याध्यापक झाला गायब ; दोन दिवस झेंडा फडकत होता, पोलिसांनी केला गुन्हा दाखल….

१ मे चा झेंडा फडकवून मुख्याध्यापक झाला गायब ; दोन दिवस झेंडा फडकत होता, पोलिसांनी केला गुन्हा दाखल....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group