• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

१ मे चा झेंडा फडकवून मुख्याध्यापक झाला गायब ; दोन दिवस झेंडा फडकत होता, पोलिसांनी केला गुन्हा दाखल….

सावरदरे प्राथमिक शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान; तब्बल दोन दिवस झेंडा उतरवलाच नाही!!मुख्याध्यपकावर गुन्हा दाखल; तर तिघांवर ठपका..

Admin by Admin
May 5, 2022
in क्राईम
0
१ मे चा झेंडा फडकवून मुख्याध्यापक झाला गायब ; दोन दिवस झेंडा फडकत होता, पोलिसांनी केला गुन्हा दाखल….
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर तालुक्यातील सावरदरे येथील प्राथमिक शिक्षकांनी तर कहरच केला असून महाराष्ट्रदिनी १ मे रोजी झेंडा फडकवून शिक्षक गायब झाले ते परत आलेच नाही! यामुळे राष्ट्रध्वज तसाच दोन दिवस फडकत राहिला. याची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज खाली घेतला.

या अवमानप्रकरणी कामचुकार शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र येथील ग्रामपंचायत प्रशासन व सजग नागरिकांनी देखील याबाबत सतर्कता पाळण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. झेंडा फडकवत ठेवून शिक्षक वादात गुंतले आणि गावही तसेच त्याकडे पाहत झोपी गेले असाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल.

मुख्याध्यापक संजय भगवंत पापळ (रा. सासवड, ता. पुरंदर ), शिक्षक प्रविण खंडेराव नांदे (रा.आळंदे, ता. भोर ), अमजद अब्बाद पटेल व शितल कृष्णा टापरे (दोघेही रा. खंडाळा, ता. खंडाळा ) अशी नेमणुकीस असलेल्या शिक्षकांची नावे असून राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी राजगड पोलिसांनी मुख्याध्यापक संजय पापळ याच्यावर गुन्हा दाखल केला असून इतर तीन शिक्षकावर ठपका देखील ठेवला आहे.

या शिक्षकांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त शाळेसमारे ग्रामपंचायत सदस्य पोपट पापळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला होता. राष्ट्रध्वज सायंकाळी सूर्यास्तापुर्वी उतरविणे गरजेचे असताना देखील शिक्षकांनी राष्ट्रध्वज हा तब्बल दोन दिवस मंगळवारी ३ मे दुपारी ३ वाजेपर्यंत तसाच फडकवत ठेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान केला.

१ मे रोजी महाराष्ट्रदिनी संहितानुसार सर्व शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवून विहित वेळेत सायकांळी सूर्यास्तापूर्वी सन्मानपूर्वक उतरविणे गरजेचे असते. मात्र सावरदरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नेमणुकीस असलेल्या चार शिक्षकांनी रविवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज हा खाली न उतरवता मंगळवार ३ मे पर्यत फडकत ठेवला.

याबाबत राजगड पोलिसांना समजताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, पोलीस हवालदार जगदीश शिरसाठ, कॉन्स्टेबल योगेश राजिवडे यांनी राष्ट्रध्वजास योग्य ती मानवंदना देऊन राष्ट्रध्वज खाली उतरविले. झेंडा अवमानप्रकरणी संबंधित शिक्षकावर कारवाई करणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे यांनी सांगितले.

Previous Post

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न नडला…

Next Post

सांगलीत आयर्विन पुलावर भीषण अपघातात दोन जण ठार ; तर आठ जखमी…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत आयर्विन पुलावर भीषण अपघातात दोन जण ठार ; तर आठ जखमी…

सांगलीत आयर्विन पुलावर भीषण अपघातात दोन जण ठार ; तर आठ जखमी...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group