• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुरुंदवाडमध्ये मुस्लीम मावळ्यांकडून शिवरायांची मशिदीत मुर्तीची प्रतिष्ठापना..

Admin by Admin
May 4, 2022
in सामाजिक
1 min read
0
कुरुंदवाडमध्ये मुस्लीम मावळ्यांकडून शिवरायांची मशिदीत मुर्तीची प्रतिष्ठापना..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्यात अजानच्या भोंग्यावरुन सध्या धार्मिक वातावरण तापलेले असताना, कुरुंदवाड शहरातील युवकांनी एकत्रित येत मशिदीत शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन केले.

दुपारच्या नमाजनंतर शहरातील सर्व मंडळांना भेटी देत, शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात शिवजयंती साजरी केली. ढेपणपूर आणि शेळके मशीद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापन करण्यात आली. या उपक्रमामुळे शहरात धार्मिक सलोखा कायम ठेवणारं समाधानकारक चित्र पाहायला मिळाले.

परंपरेनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सप्ताह सुरू असून, विविध सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी होत आहे. कुरुंदवाड शहरातही शिवजयंती अत्यंत उत्साही वातावरणात सुरू आहे.

सामाजिक कार्यकर्ते अबू घोरी, तनवीर मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी नमाज-पठण झाले. नंतर शहरातील मुस्लिम युवकांनी एकत्रित येऊन शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय…,जय…भवानी जय…शिवाजी अशा घोषणा देत, ठिकाणी भेटी दिल्या. यानंतर मुस्लिम मावळ्यांतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

मुस्लिम मावळ्यांनी संपूर्ण शहर शिवमय केल्याच्या भावना नागरिकातून व्यक्त होत आहेत. गणेशोत्सवासारखी ढेपणपूर आणि शेळके मशिदीत शिवरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्याला एकतेचा आणि सलोख्याचा संदेश दिला आहे. यावर्षी कोरोनानंतर निर्बंध मुक्त कार्यक्रमांमुळे संपूर्ण सप्ताह मिरवणूक आणि विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होणार आहे.

Previous Post

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार! ‘इतक्या’ दिवसांपर्यंत निवडणुका जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

Next Post

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न नडला…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न नडला…

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न नडला...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group