• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तुमची किती मते? हे घ्या ४ हजार रुपये ; धक्कादायक Video, नेते आक्रमक

Admin by Admin
November 19, 2024
in राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगरमधील पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सदर व्हिडीओ समोर आणला आहे. पश्चिम मतदार संघातील एका तांड्यावर मतदाराला प्रत्येक मतासाठी पाचशे रुपये वाटत असल्याचं आलं समोर आलं आहे. देवळाई तांडा येथे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप झाल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच पोलिसांच्या देखरेखीत पैसे वाटप झाल्याचा आरोपही अंबादास दानवेंनी केला आहे. या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती देखील अंबादास दानवे यांनी दिली.

  • अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?

अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या व्हिडीओमध्ये पाच ते सहाजण दिसून येत आहे. यामध्ये देवळाई तांडा येथे माजी नगरसेवक असल्याचं देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुमची किती मते..8 मतं तर हे घ्या 4 हजार रुपये…असं संभाषण होताना दिसत आहे. तसेच सदर प्रकार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. पैसा वाटपाचा हा व्हिडीओ निवडणूक आयोगाला देखील देणार असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

  • बोटाला शाई लावून 1500 रुपये वाटले-

विधानसभा निवडणुकीत एका मतासाठी मतदारांना दीड हजार रुपये दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. एक हजार देऊन आधार कार्ड आणि मतदान कार्ड जमा करून घेतले जात होते. तसेच मतदानाच्या दिवशी 500 रुपये देऊन बोटाला शाई लावून मतदान कार्ड परत घेऊन जायचे असा हा सर्व प्रकार असल्याचे आरोप केले जात आहे. सदर प्रकरणी जवाहरनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर हा सर्व प्रकार संजय शिरसाट यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच संजय शिरसाठ यांच्या फोननंतर पोलिसांनी दोन कोटी रुपये सोडून देण्यात आल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला आहे. तर सदर प्रकरणावर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले आहेत. एबीपी माझाशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पराभव जवळ दिसू लागल्याने पायाखालची वाळू सरकल्याने असे बिनबूडाचे आरोप विरोधक करत आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Next Post

मोठी बातमी! शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ? मतदानाच्या आदल्या दिवशी EC ची नोटीस; 24 तासांत…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी! शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ? मतदानाच्या आदल्या दिवशी EC ची नोटीस; 24 तासांत…

मोठी बातमी! शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ? मतदानाच्या आदल्या दिवशी EC ची नोटीस; 24 तासांत...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group