• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Admin by Admin
November 18, 2024
in क्राईम, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानासाठी मोठी तयारी केली आहे. याचदरम्यान, दुसरीकडे नागपुरातून मोठी बातमी हाती आली आहे.

नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून परतताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काटोल येथील तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ एका व्यक्तीने त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला आहे. यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला… pic.twitter.com/6oLoFyEoAy

— Supriya Sule (@supriya_sule) November 18, 2024

  • कोणी केला हल्ला?

अनिल देशमुख नरखेड येथील सभेतून परताना हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या अनिल देशमुख यांनी या दगडफेकीचा आरोप भाजपवर केला आहे. दुचाकीवरून आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या घटनेची ठोस माहिती मिळालेली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘प्रचार संपवून परतताना अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला आहे. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. या घटनेचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता राज्यात नव्हती. आपलं राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे’.

‘भाजप काळात राज्यातील विशेषत: नागपुरात कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली आहे. गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. या घटनेचा तीव्र निषेध’, असे सुळे पुढे म्हणाल्या.

Previous Post

सरपंचाचं लफडं बायकोनं पकडलं; नवऱ्याबरोबर कारमधून फिरणाऱ्या गर्लफ्रेंडची केली अशी अवस्था की.; VIDEO झाला व्हायरल

Next Post

तुमची किती मते? हे घ्या ४ हजार रुपये ; धक्कादायक Video, नेते आक्रमक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

तुमची किती मते? हे घ्या ४ हजार रुपये ; धक्कादायक Video, नेते आक्रमक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group