• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सरपंचाचं लफडं बायकोनं पकडलं; नवऱ्याबरोबर कारमधून फिरणाऱ्या गर्लफ्रेंडची केली अशी अवस्था की.; VIDEO झाला व्हायरल

Admin by Admin
November 18, 2024
in राजकीय
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Sarpanch Viral Video : नवरा-बायकोचं नातं हे पवित्र नातं मानलं जातं; पण काही जण लग्नानंतरही परस्त्रीबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवतात. अनेकदा अशा विवाहबाह्य संबंधांमुळे नात्यात दरी निर्माण होतेच; शिवाय समाजात नाचक्कीदेखील होते.

अनेकदा विवाहबाह्य संबंध सर्वांसमोर उघड होतात. अशा वेळी लोकांना तोंड दाखविण्यासाठी जागा राहत नाही. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात एका सरपंचाला त्याच्या पत्नी कारमधून गर्लफ्रेंडबरोबर जाताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्या गर्लफ्रेंडची भररस्त्यात बायकोने अशी अवस्था केली की, तिला पुन्हा लोकांना तोंड दाखविण्यासाठी जागा ठेवली नाही.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळाली आहे. व्हिडीओमध्ये कारमध्ये सरपंच नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड बसले होते. दोघेही लाँग ड्राईव्हसाठी निघाले होते, इतक्यात समोरून सरपंचाची बायको आली आणि तिनं कारमध्येच दोघांना रंगेहाथ पकडले. दोघांना एकत्र पाहून संतापलेल्या बायकोनं कारचा दरवाजा उघडला आणि गर्लफ्रेंडची चांगलीच धुलाई करायला सुरुवात केली. यावेळी तिचा सरपंच नवरा मात्र लाजेनं मान टाकून बसला होता. त्याच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

  • सरपंच नवऱ्याला गर्लफ्रेंडबरोबर रंगेहाथ पकडलं

त्याचं झालं असं की, नीमचित जिल्ह्याच्या सरपंचाचे दुसऱ्या महिलेबरोबर म्हणजे एका अंगणवाडी सेविकेबरोबर विवाहबाह्य संबंध सुरू असल्याचा संशय त्याच्या बायकोला होता. त्यामुळे तिनं नवरा कुठे जातो, कोणाला भेटतो यावर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एक दिवस सरपंच गर्लफ्रेंडबरोबर एका हॉटेलमधून बाहेर निघाला. त्यानंतर कारमध्ये बसून दोघे लाँग ड्राईव्हसाठी निघत होते. इतक्यात भररस्त्यात बायकोनं दोघांना रंगेहाथ पकडले. तिनं रस्त्यातच सरपंच नवऱ्यासह त्याच्या गर्लफ्रेंडला शिवीगाळ केली, यानंतर तिला केसांना पकडून मारहाण सुरू केली.

बायकोनं त्या महिलेचा कुर्ता पकडला अन् तिला चांगलाच चोप दिला. दोघांना एकत्र पाहून बायकोचा राग अनावर झाल्याने तिने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडला कारमध्ये असताना मारलंच. त्याशिवाय नंतर पुन्हा तिला कारमधून खाली उतरवून केसाला पकडून थोबाडीत मारण्यास सुरुवात केली. गर्लफ्रेंड स्वत:ला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागली. तिनं सरपंचाला तुझ्या बायकोला आवर, अशी विनंती केली; पण तो लाजेनं तसाच कारमध्ये बसून राहिला. तो काहीच करू शकला नाही. कारण- त्याच्या बायकोनं तिच्याबरोबर काही नातेवाईकदेखील आणले होते.

भररस्त्यात सुरू असलेला हा तमाशा पाहण्यासाठी आजूबाजूला बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी कॅमेऱ्यात ही घटना केली. त्यामुळे हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

Previous Post

जातीयवादी काँग्रेसमुळेच देशाचे नुकसान : नितीन गडकरी

Next Post

मोठी ब्रेकिंग ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

मोठी ब्रेकिंग ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group