• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उस्मानाबादमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य, एकत्र केले नमाज पठण आणि वाचली हनुमान चालीसा..

Admin by Admin
May 4, 2022
in सामाजिक
1 min read
0
उस्मानाबादमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य, एकत्र केले नमाज पठण आणि वाचली हनुमान चालीसा..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उस्मानाबाद | उस्मानाबादमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचं एक चांगलं उदाहरण पाहायला मिळालं आहे. मानवता हाच खरा धर्म असा नारा देत उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येत नमाज व हनुमान चालीसा पठण केलं.

सर्व धर्म एक आहेत, केवळ राजकीय हेतूने सध्याचं राजकारण सुरु आहे. फोडा आणि राज्य करा ही निती आजही वापरली जात आहे. मात्र तरुणांनी एकत्र यावं असा संदेश यावेळी देण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांसदर्भात अत्यंत आक्रमक भूमिका घेत भोंगे खाली उतरवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला आज म्हणजेच 4 मे रोजीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता.

राज ठाकरे यांनी काल ट्विट करून पुन्हा एकदा आंदोलनावर ठाम असल्याचे जाहीर केलं होतं. त्यांनी केवळ मनसे कार्यकर्ते नव्हे, तर देशभरातील हिंदुंना उद्देशून हे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यात बुधवारची पहाट नेमकी कशी होणार याबाबत सर्वांचा चिंता होती.

भोंग्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना अनेक ठिकाणी हिंदू -मुस्लिम ऐक्याचं दर्शन झालं.

आज काय होणार, भोंगा वाजणार, की हनुमान चालीसा याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, ना भोंगा वाजला नाही हनुमान चालीसा, अनेक ठिकाणी पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना झाली. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण शांत असल्याचं चित्र आहे.

Previous Post

मनसे आंदोलक, पोलिसांमध्ये झाली झटापट..

Next Post

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार! ‘इतक्या’ दिवसांपर्यंत निवडणुका जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार! ‘इतक्या’ दिवसांपर्यंत निवडणुका जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार! ‘इतक्या’ दिवसांपर्यंत निवडणुका जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group