• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला

Admin by Admin
November 18, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संताजी घोरपडे हे रविवारी रात्री प्रचार संपवून आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे परतत होते. त्यावेळी मनवाड येथे सहा ते सात लोकांनी त्यांची गाडी थांबवली. जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला भेटायला थांबले असतील, असे सुरुवातीला संताजी घोरपडे यांना वाटले. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांसह या लोकांची विचारपूस करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यावेळी बाहेरील लोकांनी काठ्या आणि भाल्यासह संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला चढवला.

संताजी घोरपडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून आणि हातामधून रक्त वाहत होते. मारेकऱ्यांचा हल्ला संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसाबसा परतावून लावला. त्यानंतर हल्लेखोर रस्त्यालगत असणाऱ्या शेतात पळून गेले. जाताना त्यांनी संताजी घोरपडे यांच्या गाडीवरही दगडफेक केली.

यानंतर संताजी घोरपडे आणि त्यांचे सहकारी कोल्हापूरमध्ये परतले. यानंतर संताजी घोरपडे यांच्या डोक्यातून आणि हातातून रक्त वाहत असतानाचे फोटो कोल्हापूरमध्ये व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करणारे लोक कोण होते, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. यंदा करवीर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. संताजी घोरपडे हे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे संताजी घोरपडे आज पुन्हा प्रचारात उतरणार का, हे बघावे लागेल. संताजी घोरपडे यांच्यावरील हल्ल्यामुळे कोल्हापूरचे राजकारण शेवटच्या दिवशी तापण्याची शक्यता आहे.

घोरपडे यांच्यावरील या हल्ल्यामागील सूत्रधार कोण, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. संताजी घोरपडे यांच्या डोक्यावर, हातावर काही वार झाले आहेत. त्यांचे शरीरातून रक्त वाहत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | ‘या’ आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, मतदानाच्या काही तास आधी खळबळ

Next Post

‘काँग्रेसमधली बंडखोरी भाजप पुरस्कृत’ म्हणत सांगलीत आता नवा वाद..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘काँग्रेसमधली बंडखोरी भाजप पुरस्कृत’ म्हणत सांगलीत आता नवा वाद..!

'काँग्रेसमधली बंडखोरी भाजप पुरस्कृत' म्हणत सांगलीत आता नवा वाद..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group