• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | ‘या’ आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, मतदानाच्या काही तास आधी खळबळ

Admin by Admin
November 17, 2024
in क्राईम, राजकीय
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम अखेरच्या टप्प्यात आली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावण्यास काही तास शिल्लक आहेत. तर, दुसरीकडे व विधानसभा निवडणुकीच्या उतरलेल्या माजी आमदाराला मोठा धक्का बसला आहे.

माजी आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

जुन्नर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार शरद सोनवणे यांचा हा अश्लील व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. अश्लील आणि चारित्र्यहनन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एका इंस्टाग्राम पेज वरून शरद सोनवणे यांचे अश्लील व्हिडिओ नारायणगाव आणि जुन्नर परिसरातल्या काही व्हाट्स अॅप ग्रुपवर मतदारसंघात व्हायरल झाले.

या प्रकरणानंतर जुन्नरचं राजकारण पुन्हा एकदा रसातळाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. जुन्नर तालुक्यातील शरद शरद सोनवणे समर्थक महिलांनी तातडीने रात्री यावर आळेफाटा पोलीस स्टेशनवर रात्री उशिरा मोर्चा काढला. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांसह सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी सुद्धा सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दरम्यान शिवजन्मभूमी सारख्या राज्याला आदर्श देणाऱ्या तालुक्यात असा नीचपणा सुरू झाल्याने मोठ्या संतप्त, नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान जुन्नरमध्ये आजी-माजी आमदार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तर प्रमुख 5 उमेदवारांची पंचरंगी लढत याच एकमेव तालुक्यात आहे. यंदाची जुन्नरची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, आता वैयक्तिक पातळीवर, चारित्र्यहनन करणारे व्हिडीओ होत असल्याने मतदारांमध्ये राजकारणाच्या खालावलेल्या प्रचाराच्या मुद्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

Previous Post

सावधान हे वाचा.. सांगलीत आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी व्हाट्सऍप ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल

Next Post

मोठी ब्रेकिंग | जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला

मोठी ब्रेकिंग | जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group