• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘काँग्रेसमधली बंडखोरी भाजप पुरस्कृत’ म्हणत सांगलीत आता नवा वाद..!

Admin by Admin
November 18, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
‘काँग्रेसमधली बंडखोरी भाजप पुरस्कृत’ म्हणत सांगलीत आता नवा वाद..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या ऑनलाईन | लोकसभा निवडणुकीला सांगली पॅटर्न चांगलाच गाजला होता. लोकसभेला काँग्रेसने सांगलीत बंडखोरी करत विजयही मिळवला होता. सांगलीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीत सांगलीत पुन्हा तोच पॅटर्न पाहायला मिळत आहे.

मात्र यावेळी काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आहे. काँग्रेसने सांगली विधानसभा मतदार संघातून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सांगलीत झालेली बंडखोरी ही भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सांगलीतील वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदार संघात जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. यशश्री पाटील या दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी आहेत.

सांगलीमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेलाही सांगलीची निवडणूक चर्चेत राहीली होती. विधानसभेला इथं काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आहे. काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांनी या मतदार संघातून बंडखोरी केली आहे. त्या दिवंगत मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. मी पाच वर्षे तुमच्यासाठी राबलो आता पाच वर्षे मला द्या असं आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीकरांना केलं आहे.

यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरी बद्दलही वक्तव्य केलं आहे. काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी ही भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वसंतदादा बँकेचे ठेवीदार देशोधडीला लागले आहेत. या गोरगरीबांच पाप बंडखोरी करणाऱ्यांना लागणार आहे असंही ते म्हणाले. वसंतदादा बँकेची चौकशी देवेंद्र फडणवीस यांनी लावली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी मदन पाटील याचे काही लोक त्याच्या गळ्याला लागले. त्यामुळेच हे बंड झाले आहे असे ते म्हणाले.

ही निवडणूक भाजपने वेगळ्या मार्गाला नेली आहे. मदन भाऊ मंचाचे काही कार्यकर्ते हे भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यांनी काँग्रेस संपवण्याचा डाव रचला आहेत. त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचे सांगलीत खच्चीकरण केले जात आहे असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. मात्र असं असलं तरी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आपल्या मागे उभा आहे. बंडखोर हा स्पर्धेत नाही. त्यामुळे काँग्रेस विरूद्ध भाजप अशी लढत या मतदार संघात होत असल्याचे पृथ्वीराज पाटील म्हणाले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला

Next Post

मोठी बातमी | मागासवर्गीय उमेदवार पडल्यास याद राखा, ‘यांनी’ काढली काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | मागासवर्गीय उमेदवार पडल्यास याद राखा, ‘यांनी’ काढली काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी

मोठी बातमी | मागासवर्गीय उमेदवार पडल्यास याद राखा, 'यांनी' काढली काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group