• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत दोन गटात हाणामारी

Admin by Admin
May 4, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगलीत दोन गटात हाणामारी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुकानासमोर दुचाकी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून मारामारी झाली. यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. गारपीर चौकात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

या प्रकरणी चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात मारामारीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आदर्श देवानंद कांबळे (वय 19, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) याने फिर्याद दाखल केली आहे. आदर्शसह त्याचा मित्र जीवन घाडगे, मावसभाऊ राहुल शिंदे हे जखमी आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. नारायण आपटे, कविता आपटे व त्यांच्या दोन नातेवाईक महिला अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहुल घाडगे याचे संशयित आपटे यांच्या बिल्डिंगमध्ये कपड्यांचे दुकान आहे. दुकानासमोर वाहने पार्किंग करण्यावरून राहुल व आपटे यांच्यात वाद आहे. आदर्श कांबळे हा त्याचा भाऊ राहुल शिंदे याला दुचाकीवरून घेऊन कपडे आणण्यासाठी राहुलच्या दुकानात गेला होता. त्याने दुकानासमोर दुचाकी लावल्यानंतर आपटे याने ‘इथे गाडी लावायची नाही’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली.

यावरुन त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. या वादातून आपटेसह चारही संशयितांनी काठी व फरशीने हल्ला केला. यामध्ये आदर्शसह तिघे जखमी झाले. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला. लोकांनी मोर्ठी गर्दी केली. अर्धा तास मारामारी सुरू होती. विश्रामबाग पोलिसांना याची माहिती मिळताच ते दाखल झाले. रात्री उशिरा आदर्श कांबळे याची फिर्याद घेण्यात आली. त्यानुसार आपटेसह चौघांविरुद्ध मारामारी व ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

सांगली | जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात…

Next Post

मनसे शहराध्यक्ष यांच्यासह ८०० जणांना नोटीस

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मनसे शहराध्यक्ष यांच्यासह ८०० जणांना नोटीस

मनसे शहराध्यक्ष यांच्यासह ८०० जणांना नोटीस

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group