• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत नरबळीचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला

Admin by Admin
November 4, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गोपनीय खबऱ्या | मिरज तालुक्यातील मौजे डिग्रजमध्ये नरबळी देण्याचा प्रयत्न फसला असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी संशयितांना ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

या घटनेची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली असून, परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक काळ्या रंगाची गाडी व एक स्विफ्ट डिझायर गाडी मौजे डिग्रज येथील स्मशानभूमीजवळ आल्या. गाडीतून दोन अल्पवयीन मुलांसह सुमारे दहाजण आले होते. त्यांपैकी काही महिलांसह दोन अल्पवयीन मुले खाली उतरले व गाडीच्या प्रकाशझोतात स्मशानभूमीजवळ असलेल्या झाडाखाली ठेवलेल्या मूर्तीची पूजा करू लागले. यापैकी दोन अल्पवयीन मुले होती. या प्रकाराबद्दल संशय वाटू लागल्याने शेतात काम करणारे कामगार व जवळच असलेल्या बंधाऱ्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी संशयितांना विचारले असता, संशयितांनी जाब विचारणाऱ्यांनाच दमदाटी व शिवीगाळ सुरू केली.

त्यानंतर या लोकांनी पोलिसपाटील सतीश पाटील, सरपंच तानाजी जाधव, बाळू काटे व अन्य ग्रामस्थांना मोबाईलवरून याची कल्पना दिली. काही वेळातच सुमारे दोनशे ग्रामस्थ स्मशानभूमीत दाखल झाले. त्यावेळी झाडाखाली एक मांत्रिक पूजा करत होता, तर काही लोक त्याच्यामागे उभे होते. त्यांपैकी दोघांच्या हातात लिंबू टोचलेले त्रिशूल होते, तर डिझायर गाडीमधील लोक गाडीतच बसून होते.ग्रामस्थांनी याबाबत संशयितांना जाब विचारला असता, ‘तुमचा काय संबंध? आम्ही काय पण करू. तुम्ही इथून निघून जा,’ अशी उद्धट उत्तरे दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांनी शिवीगाळ करत संशयितांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची कल्पना दिली. काही वेळातच पोलिस घटनास्थळी झाले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेची पार्श्वभूमी अशी, स्मशानभूमी गावापासून सुमारे अर्धा किलोमीटरवर बंधाऱ्याच्या बाजूला आहे. स्मशानभूमीच्या आजूबाजूला शेती आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी ते संशयित त्याच काळ्या रंगाच्या थार गाडीतून स्मशानभूमीत आले व त्यांनी झाडाला शेंदूर फासून पूजा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील त्याच गाडीतून येऊन मूर्ती ठेवून पूजा करून निघून गेले.

सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याला पत्र दिले व संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली. संशयितांची नावे माहीत नसल्याने त्यांनी केवळ गाडी नंबर तक्रार अर्जात नमूद केला होता. पोलिसांनी त्या नंबरच्या आधारे गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता ती गाडी लक्ष्मीनगर (गोसावी गल्ली) माधवनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी गाडीमालकाला चौकशीसाठी बोलावले असता त्याने सर्व घटनेची कबुली दिली व मूर्ती काढून नेण्याचे मान्य केले. घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित अमावास्येलाम्हणजेच शुक्रवार येणार असल्याची कल्पना आल्याने ग्रामस्थांनी शुक्रवारी स्मशानभूमीत पहारा ठेवला होता. याची चाहूल लागल्याने संशयितांनी शुक्रवारचा बेत बदलून शनिवारी पूजा करण्यासाठी स्मशानभूमीत आले. त्यावेळी ग्रामस्थांनी चोप देऊन त्यांना पोलिसांच्या हवाली केले.

Previous Post

ब्रेकिंग | ईद्रीस नायकवडी स्टार प्रचारक..! ३६ नेते उडवणार महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा

Next Post

ब्रेकिंग | मिरजेत पाच लाखांची रोकड जप्त, स्थिर सर्वेक्षण पथक व पोलिसांची कारवाई..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरजेत पाच लाखांची रोकड जप्त, स्थिर सर्वेक्षण पथक व पोलिसांची कारवाई..

ब्रेकिंग | मिरजेत पाच लाखांची रोकड जप्त, स्थिर सर्वेक्षण पथक व पोलिसांची कारवाई..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group