• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्रीबाबतीत घेतला ‘हा’ निर्णय, म्हणाले…

Admin by Admin
October 26, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्रीबाबतीत घेतला ‘हा’ निर्णय, म्हणाले…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 च्या मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 18 नोव्हेंबर रोजीचे 17.00 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर रोजीचे 23.59 पर्यंत व 23 नोव्हेंबर रोजीचे 00.01 पासून ते 23.59 पर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मद्य व ताडी विक्रीच्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई / कोरडा दिवस जाहीर करण्याबाबतची तरतूद लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री मनाई/ कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत तरतूद आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मद्य व ताडी विक्रीच्या आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

ही निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये जिल्हाधिकारी यांना असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र ‍विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानाच्या अनुषंगाने 18 नोव्हेंबर रोजीचे 17.00 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर रोजीचे 23.59 पर्यंत व मतमोजणीच्या अनुषंगाने 23 नोव्हेंबर रोजीचे 00.01 पासून ते 23.59 पर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मद्य व ताडी विक्रीच्या आस्थापना (सीएल-2, सीएल-3, सीएलएफएलटिओडी 3, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4, एफएलबीआर-2, फॉर्म ई-2. टिडी-1) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

Previous Post

विधानसभेला जिल्ह्यातील नेत्यांना पाडपाडीत रस..! येश्या-केश्या पॅटर्न चर्चेत.. आयारामांना संधी..!!

Next Post

अरे उद्यापर्यंत थांब भावा, काँग्रेसची ताकद असलेल्‍या जागांवर ठाकरे गटाचा दावा..! उत्सुकता वाढली.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अरे उद्यापर्यंत थांब भावा, काँग्रेसची ताकद असलेल्‍या जागांवर ठाकरे गटाचा दावा..! उत्सुकता वाढली.

अरे उद्यापर्यंत थांब भावा, काँग्रेसची ताकद असलेल्‍या जागांवर ठाकरे गटाचा दावा..! उत्सुकता वाढली.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group