• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विधानसभेला जिल्ह्यातील नेत्यांना पाडपाडीत रस..! येश्या-केश्या पॅटर्न चर्चेत.. आयारामांना संधी..!!

Admin by Admin
October 26, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
आम्हाला ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहिजे..! शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना पाहिजे असलेला नेता कोण.. ? वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. तसेच सांगली पॅटर्नमुळे चर्चेत आलेल्या सांगली जिल्ह्यातही काही लक्षवेधी लढती पाहायला मिळतील, असे चित्र आहे. जिल्ह्यात निवडून येण्याबरोबर पाडापाडीचे राजकारण केले जाणार, यात कोणतीही शंका नाही. स्वत: निवडून येण्यापेक्षा दुसऱ्याला पाडण्यात काहींना जास्त रस दिसतो, अशी काही मतदारसंघांतील स्थिती आहे. राज्य पातळीवरील कुरघोड्यांचे राजकारण नेतेमंडळींनी जिल्हा पातळीवर आणले आहे.

लोकसभेला सांगली पॅटर्न राज्यात नव्हे, तर देशात चर्चेत आला. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील येश्या -केश्या पॅटर्न चर्चेत आला आहे. यंदाच्या विधानसभेला तिकीट मिळविण्यासाठी माजी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे राष्ट्रवादीत गेले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले. भाजपचे मोहन वनखंडे हे काँग्रेसमध्ये गेले. अर्ज भरेपर्यंत आणखी काय बदल पाहायला मिळणार? याची उत्सुकता वाढली आहे.

माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत उडी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित पाटील यांच्याविरुद्ध ते शड्डू ठोकतील. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडेही शिवसेनेतून तिकडे त्यांच्या मदतीसाठी गेले. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मिरजेची जागा उद्धवसेनेला मिळू शकते म्हणून यापूर्वीच सिद्धार्थ जाधव यांनी शिवबंधन बांधून घेतले आहे. मिरजेत वंचितची उमेदवारी मिळते म्हणून राष्ट्रवादीचे युवानेते विज्ञान माने तिकडे गेले. तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवारीसाठी आणखी काय पाहायला मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाआघाडी आणि महायुतीमध्ये जागा कोणाला द्यायच्या, यावरून चर्चा झाली आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात चित्र स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाकडे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात तिकीट मिळविण्यासाठी काहींनी पक्षांतर केले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळालेले विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात गेले. भाजपचे प्रा. मोहन वनखंडे यांनी पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणातील आयाराम-गयाराम चर्चेत आले आहेत. या येश्या केश्या यांच्या यादीत आणखी कोणाची भर पडणार ते लवकरच दिसून येईल.

मोठ्या राजकीय पक्षात जिल्हाध्यक्ष हे महत्त्वाचे पद असते. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच पक्षाचा चेहरा म्हणून या पदाला महत्त्व असते. परंतु रात्रीत जिल्हाध्यक्ष पक्ष बदलत असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचे चित्र दिसते. नेत्यांबरोबर काही कार्यकर्त्यांचीही फरफट या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

Previous Post

मिरजेत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, घेतला ‘हा’ निर्णय..!

Next Post

ब्रेकिंग | सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्रीबाबतीत घेतला ‘हा’ निर्णय, म्हणाले…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्रीबाबतीत घेतला ‘हा’ निर्णय, म्हणाले…

ब्रेकिंग | सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्रीबाबतीत घेतला 'हा' निर्णय, म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group