• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील ‘या’ तीन मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जाहिर..

Admin by Admin
October 25, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना इस्लामपुरातून, आमदार मानसिंगराव नाईक यांना शिराळ्यातून, तर रोहित पाटील यांना तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली.

खानापूर मतदारसंघही त्यांच्याच वाट्याला येण्याची चिन्हे असली, तरी अद्याप या जागेचा निर्णय प्रलंबित आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा शरद पवार गटाला सुटण्याची चिन्हे आहेत.

सांगली जिल्ह्यात विद्यमान आमदारांपैकी जयंत पाटील व मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी कायम राहिली. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्याऐवजी अपेक्षेप्रमाणे त्यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली. आर. आर. पाटील यांनी या मतदारसंघात सलग सहा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यानंतर सुमनताई पाटील यांनी या मतदारसंघाचे दोनवेळा नेतृत्व केले. आता आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. प्रथमच ते निवडणूक रिंगणात उतरत आहेत.

सांगली जिल्ह्यातील हक्काच्या तीन जागांसह मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला गेलेली खानापूरची जागाही या गटाला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या जागेचा फैसला अद्याप झालेला नाही. ती जागा मिळाली, तर राष्ट्रवादीकडे सर्वाधिक चार जागा येतील. काँग्रेसच्या वाट्याला सध्या तरी पलूस-कडेगाव, सांगली व जत या तीन जागा आल्या आहेत. मिरजेतील जागेवरून काँग्रेस व उद्धवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.

Previous Post

ब्रेकिंग | जतमध्ये भाजपात होणार बंडखोरी; तमनगौडा रवीपाटील यांची अपक्ष उमेदवारी

Next Post

मविआचा 90-90-90 चा नवा फॉर्म्युला : तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 जागा लढणार, उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना; बाळासाहेब थोरात यांची माहिती

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मविआचा 90-90-90 चा नवा फॉर्म्युला : तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 जागा लढणार, उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना; बाळासाहेब थोरात यांची माहिती

मविआचा 90-90-90 चा नवा फॉर्म्युला : तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 जागा लढणार, उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना; बाळासाहेब थोरात यांची माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group