गोपनीय खबऱ्या – सांगली | भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये काल अधिकृत पक्षप्रवेश झाला. अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला असून महायुतीमध्ये वेळेनुसार अशा गोष्टी कराव्या लागतात अशी प्रतिक्रिया संजय पाटील यांनी दिली.
यामुळे आता संजय पाटील हे तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे रोहित पाटील यांच्यासमोर हे कडवे आव्हान समजले जात आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीनंतर आबा-काका गटातील संघर्ष पुन्हा पेटणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

