• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई

Admin by Admin
October 22, 2024
in क्राईम, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता काळात कुठलेही गैरव्यवाहार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

प्रत्येक शहरातील नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. या नाकाबंदी दरम्यान पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय.

 

संबंधित गाडी ही सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा अशीच एक घटना घडल्याच समोर आले आहे. हडपसर सोलापूर रोडवरून जाणाऱ्या एका गाडीत २२ लाख रुपये सापडले आहेत.

आचारसंहितेसाठी नाकेबंदी करणाऱ्या हडपसर पोलिसांना कार चेकिंगच्या वेळी एका कारमध्ये मोठी रक्कम सापडलीय. ही रक्कम किराणामाल दुकानदाराची आहे. एका होलसेल व्यापाऱ्याचे बिल असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येतेय. पोलिसांकडून या गाडीची चेकिंग सुरू असताना त्यामध्ये ही रक्कम आढळून आली.

खेड शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता २२ लाखांची रक्कम आढळून आल्याने खळबळ उडालीय. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय. खेड शिवापूर प्रकरणात पोलिसांनी कारवाई केलीय. मात्र रोकड जप्ती प्रकरणी गुन्हा दाखल होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलीय.

१० लाखांच्यावर रोकड असल्याने हे प्रकरण आता आयकर विभागाकडे वर्ग करण्यात आलाय. तसेच आयकर विभागाकडे पाच कोटींची रोकड देखील वर्ग करण्यात आलीय. या प्रकरणात आता पुढील कारवाई आयकर विभाग त्यांच्या कायद्याप्रमाणे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. दरम्यान ⁠अशा प्रकरणात निवडणूक आयोगाने दिलेल्या स्टॅंडर्ड ॲापरेटींग प्रोसीजर / एसओपी प्रणाणे कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

महाविकास आघाडी खाडेंच्या रथाखाली उद्योगपती अन गुरुजीला ढकलणार..? अदखलपात्र चाप्टर बंड्याची बम्बई वारी..?

Next Post

माजी खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
माजी खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..

माजी खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group