• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाविकास आघाडी खाडेंच्या रथाखाली उद्योगपती अन गुरुजीला ढकलणार..? अदखलपात्र चाप्टर बंड्याची बम्बई वारी..?

Admin by Admin
October 22, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, माफ करा स्पष्ट बोलतो, राजकीय, शोध पत्रकारिता
1 min read
0
महाविकास आघाडी खाडेंच्या रथाखाली उद्योगपती अन गुरुजीला ढकलणार..? अदखलपात्र चाप्टर बंड्याची बम्बई वारी..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

२०२४-च्या निवडणूकीत कुणाची एक्झिट होणार ! शिष्याच्या अपराधाचा दंड गुरु भोगणार ?

सत्तेची नशा माणसाला स्वस्त बसू देत नाही. सत्ता, संपत्ती आणि सतत प्रसिद्धीच्या झोतात वावर करत रुबाब करणाऱ्या व्यक्ती ज्यावेळी आपल्याच कुटूंबातील प्राणप्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष करू लागतात त्यावेळी समृद्धी असून देखील दारिद्र्याच्या वाटचालीचा शुभारंभ करतात. पद, प्रतिष्ठा सर्व काही आबाधित ठेवण्यासाठी स्वतःचीच विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात पाहिली जाते, त्यावेळी वैफल्याचे आमंत्रण घातक ठरते. अतिविश्वासाचा घेरा नेहमीच महागात पडतो. सोयीच्या राजकारणासाठी सर्व काही समाप्त होणारे राजकारण सुरु झाले आहे. सत्तेची नशा करताना पाप पुण्याईची भीती जरूर बाळगली पाहिजे.

जसा राजा, तशी प्रजा.. जसा नेता, तसा त्याचा कार्यकर्ता.. मेहनत करे मुर्गी, फकीर खाए अंडा’ असे म्हणत एक प्रकारे संग्या – बाळयाच्या आत्म्यात अन परमात्म्यात सवतासुभा झाल्याने प्रबळ इच्छाशक्ती बाळगून निवडणूक मैदानात उतरलेल्या विभिषणाचे करायचं काय..? याची चिंता सत्तारुढ सिंहासनावर बसलेल्या राजाला लागली आहे.

२०२४ ची विधानसभा निवडणुक एका वेगळ्या वळणावर येवून ठेप घेतली आहे. मंत्री गेली पंधरा वर्ष विजयाचा रथ ओढत आहेत. त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने उद्योगपती व गुरुजी यांना रथाच्या चाकाखाली ढकलण्याचे ठरविले आहे. जर गुरुजींचा बळी गेला तर असंतोषाच्या उद्रेकाचा फायदा कोणाला होणार.? निवडणूकीत आखली गेलेली ही रणनिती कुणाच्या सोयीची ठरणार..? अच्छे दिन, सच्चे दिन आणि बुरे दिनाच्या वाटचालीचा प्रारंभ कुणासाठी असणार.! बाळसं कुणाला येणार हे ठरणार आहे. पिकलं पान केव्हाही गळणारचं हा निसर्ग नियम आहे. हिरव्या देठाची ताकद मोडण्यासाठी राजकीय स्पर्धा सुरु झाली आहे.

गंमत म्हणून निवडणूक लढविणे आता एवढे सोपे राहिले नाही. मला आमदार झाल्यासारख वाटतं असा सूर मतदार संघातील इच्छुकांच्या कानात घुमू लागला आहे.

‘ये मिरज विधानसभा है। बाकी सब सवता सुभा है। हे इच्छुकांनी ध्यानात घेतले पाहिजे. २०२४ ची निवडणूक मंत्री महोदयांसाठी क्लेषदायक ठरणार की गुरुजी यांची राजकीय एक्झीट पहावयास मिळणार.! का उद्योगपतीला पुन्हा एकदा सैरभैर करणार..? शिष्याच्या अपराधाचा दंड गुरु भोगणार की शिष्याला सामोरे जावे लागणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Previous Post

मोठी बातमी | एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती..

Next Post

ब्रेकिंग | पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई

ब्रेकिंग | पुण्यात आधी खोके सापडले, आता पेट्या; नाकाबंदीवेळी कारमधून लाखोंची कॅश जप्त, पोलिसांची धडक कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group