• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती..

Admin by Admin
October 22, 2024
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मोठी बातमी | एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

“काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओक्केमध्ये आहे”, हा आमदार शहाजीबापू पाटील यांचा डायलॉग प्रचंड गाजला. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडून आला होता.

या भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबई असला तरी सूत्र थेट आसामाच्या गुवाहाटी येथून हालत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारत आपल्यासोबतच्या सर्व आमदारांना गुवाहाटीत नेलं होतं. तिथे काही दिवस प्रचंड अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडून आलं होतं. या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिरात जावून पूजा केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे आमदार देखील होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आता पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्याबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या मंदिरात पूजा करण्याची शक्यता आहे.

  • राज्य सरकारकडून कामाख्या मंदिर व्यवस्थापनाला महत्त्वाची माहिती

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री गुवाहाटीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज रात्री बारा वाजता कामाख्या देवीच्या मंदिरात पूजा होणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून कामाख्या देवी मंदिर व्यवस्थापनाला कळवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Previous Post

ब्रेकिंग | खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोकड पकडली; कार सत्तेतील बड्या आमदाराची?

Next Post

महाविकास आघाडी खाडेंच्या रथाखाली उद्योगपती अन गुरुजीला ढकलणार..? अदखलपात्र चाप्टर बंड्याची बम्बई वारी..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
महाविकास आघाडी खाडेंच्या रथाखाली उद्योगपती अन गुरुजीला ढकलणार..? अदखलपात्र चाप्टर बंड्याची बम्बई वारी..?

महाविकास आघाडी खाडेंच्या रथाखाली उद्योगपती अन गुरुजीला ढकलणार..? अदखलपात्र चाप्टर बंड्याची बम्बई वारी..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group