• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोकड पकडली; कार सत्तेतील बड्या आमदाराची?

Admin by Admin
October 21, 2024
in क्राईम, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोकड पकडली; कार सत्तेतील बड्या आमदाराची?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गोपनीय खबऱ्या – विशेष प्रतिनिधी | राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज सायंकाळच्या सुमारास एका वाहनामधून काही रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली.

त्यानुसार राजगड पोलिसांनी संबंधित वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये तब्बल ५ कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांना मिळून आली. तसेच सदर वाहन हे सत्तेतील एका बड्या आमदाराचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर रक्कम आणि इनोव्हा क्रिस्टा कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एमएच ४५ एएस २५२६ पोलिसांनी जप्त केले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग तसेच तहसिलदार, प्रांतअधिकारी आदी दाखल झाले आहेत. तसेच आयकर विभाग, फाईंग स्कॉड देखील भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. सदर वाहनात चार व्यक्ती असून यामध्ये एकजण संबंधित आमदाराचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. राजगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

मनसेची मिरज विधानसभा क्षेत्रात चाचपणी, विलास कांबळेना उमेदवारी शक्य..?

Next Post

मोठी बातमी | एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती..

मोठी बातमी | एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group