• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत खळबळ | ‘या’ प्रकरणी तिघांना अटक, विकायचे असे काही.. कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

Admin by Admin
September 13, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज शहरात पोलिसांनी धडक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील काही परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री जोरात सुरु असल्याच्या चर्चेने शहरात खळबळ उडाली होती. त्याच अनुषंगाने महात्मा गांधी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस पथकाने सापळा रचून नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या धनंजय प्रदीप गाडे, वय २२, रा. मालगांव रोड, सुभाषनगर मिरज, ओंकार संभाजी साळुंखे, वय २२, रा. मंगळवार पेठ, मिरज व महम्मदरफीक सादीक गोदड, वय २४, रा. गोदड मळा, टाकळी रोड, मिरज यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर एनडीपीएस कलम ८ (क), २२(ब ) सह औषधी – सौंदर्यप्रसाधने कायदा कलम १८ सी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांच्या ताब्यातील ५४,५२०/- रु. किंमतीच्या नायट्रावेट १० या नावाच्या ६०० नशेच्या गोळ्यांचा साठा व दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. यामध्ये पोलीस दप्तरी रेकॉर्डवर असलेला ओंकार संभाजी साळुंखे हा सांगली व कोल्हापूर या जिल्हयांतून सध्या हद्दपार आहे.त्याच्यावर शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहा. पोलीस फौजदार धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सूरज पाटील, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत, विनोद चव्हाण, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर यांनी केली.

Previous Post

ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यात पुन्हा खळबळ : ७५ वर्षाच्या वृद्धेवर युवकाचा बलात्कार

Next Post

मिरजेत लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा.!

मिरजेत लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group