• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यात पुन्हा खळबळ : ७५ वर्षाच्या वृद्धेवर युवकाचा बलात्कार

Admin by Admin
September 1, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर – खबऱ्या प्रतिनिधी | वाळवा तालुक्यातील एका गावात ७५ वर्षाच्या वृद्धेवर युवकाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी घडला. संतप्त नागरिकांनी युवकाला पकडून बेदम चोप दिला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सोमनाथ चंद्रकांत शिंदे (वय २८ ) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पिडीत वृद्धेवर सांगली येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वृध्दा ही पुतण्याच्या कुटुंबाबरोबर राहत होती. सोमनाथ याचे वृद्धेच्या घरात येणे-जाणे होते. शनिवारी तिच्या घरातील इतर लोक बाहेर गेले होते. वृध्दा घरात एकटीच होती. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास संशयित सोमनाथ हा वृद्धेच्या घरात शिरला. त्याने वृद्धेवर बलात्कार केला. तिने ओरडा-ओरडा केल्याने शेजारील महिलानी वृद्धेच्या घराकडे धाव घेतली. महिलांनी संशयित सोमनाथ याला पकडून चोप दिला. या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच सोमनाथ याला त्यांनी बेदम मारहाण केली.

लोकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक राहूल घुगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सोमनाथ याला ताब्यात घेतले. वृद्धेला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस अधिकार्‍यांनी रुग्णालयातच वृद्धेचे जबाब घेतला. तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Previous Post

कुपवाडमध्ये आज दहीहंडीचा थरार : सनीभाऊंची १,११,१११ रुपयांची भव्य दहीहंडी..!

Next Post

मिरजेत खळबळ | ‘या’ प्रकरणी तिघांना अटक, विकायचे असे काही.. कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मिरजेत खळबळ | 'या' प्रकरणी तिघांना अटक, विकायचे असे काही.. कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group