• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमध्ये आज दहीहंडीचा थरार : सनीभाऊंची १,११,१११ रुपयांची भव्य दहीहंडी..!

Admin by Admin
August 31, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमध्ये आज दहीहंडीचा थरार : सनीभाऊंची १,११,१११ रुपयांची भव्य दहीहंडी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड –खबऱ्या प्रतिनिधी | कुपवाड शहरात प्रथमच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सनीभाऊ धोतरे युथ फाऊंडेशन, कुपवाडच्या वतीने रु.१,११,१११/- चा भव्य दिव्य दहीहंडीचा जल्लोषी उत्सव आज साजरा होणार आहे. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड शहरात प्रथमच आज शनिवारी सायंकाळी ५.०० वाजता अकुज ड्रीमलॅंड सोसायटी चौक, कुपवाड येथे रु.१,११,१११/- ची भव्य दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे.या दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम व खासदार विशालदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत. मा.पृथ्वीराज बाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमासाठी कलर्स मराठी या चॅनलवरील संत बाळूमामा या मालिकेतील बाळूमामांची भूमिकेचा अभिनय करणारे कलाकार सुमित पुसावळे हे उपस्थित राहणार आहेत. स्नेहा पिंपरीकर, पुणे यांचा भव्य डान्स शो होणार आहे. तसेच रिल्स स्टार निवृत्ती (नारू) बालाजी आणि विशाल उपस्थित असणार आहेत. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. तसेच महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहिती सनी धोतरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बाळासाहेब मंगसुळे,अख्तरहुसेन मुजावर, श्रीकृष्ण कोकरे, राहुल पाटील, समीर मुजावर, सिकंदर मुल्ला, अनिल कवठेकर, राजेंद्र पवार, दिलीप धोतरे,अमोल कदम, नूरमंहम्मद ढालाईत, सकलेन मुजावर, कुलभूषण कर्नाळे, सुरज धोतरे,आदी उपस्थित होते.

तरी हजारोंच्या संख्येने कुपवाड व सांगली शहरातील लोकांनी उपस्थित राहून स्पर्धक गोविंदांना, कुपवाडच्या जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सनी धोतरे युथ फाउंडेशनने केले आहे.

Previous Post

मिरजेत आज सायंकाळी ‘या’ कारणासाठी होणार तुफान गर्दी, पाहायला मिळणार अनोखा थरार..!

Next Post

ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यात पुन्हा खळबळ : ७५ वर्षाच्या वृद्धेवर युवकाचा बलात्कार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यात पुन्हा खळबळ : ७५ वर्षाच्या वृद्धेवर युवकाचा बलात्कार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group